ताडोबात वाघांची मौजमस्ती, बबलीच्या पिल्लांचे पर्यटकांना दर्शन #tadoba - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ताडोबात वाघांची मौजमस्ती, बबलीच्या पिल्लांचे पर्यटकांना दर्शन #tadoba

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :

ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वाघांचे मनसोक्त दर्शन होत आहे. बबलीच्या पिल्लांनी पर्यटकांना दर्शन दिले असून मौजमस्ती करताना पिल्लांचा व्हिडीओ पर्यटकांनी टिपला आहे.

वाघांच्या तुम्ही नानाविध अदा बघितल्या असतील. अनेकांनी वाघांना खेळताना बघितलेले आहे. तर कुणी त्यांना मौजमस्ती करताना बघितले. काहींनी तर त्याही पलिकडे जाऊन वाघांची प्रणयक्रिडा बघितलेली आहे. दोन दिवसांपूर्वी वरोरा येथील पर्यटक डॉ. हेमंत खापणे मित्रांसोबत ताडोबात सफारीसाठी गेले होते.


त्यांना बबली व तिच्या पिल्लांनी मनसोक्त दर्शन दिले. या वाघांच्या बछड्यांचे मौजमस्ती करीत असतानाचा व्हिडीओ चित्रित केला आहे. या व्हिडीओचं क्रेडीट वरोरा येथील डॉ. हेमंत खापणे यांनाच जाते. त्यांनी मोठ्या शिताफीने हे क्षण आपल्या कॅमेरामध्ये कैद केले आहेत.

Pages