संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल #sambhaji_bhide - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल #sambhaji_bhide

Share This
खबरकट्टा /महाराष्ट्र :
महात्मा करणारे 'शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान' संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून नौपाडा पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला.

साईबाबा, महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. सोमवारी आव्हाड यांनी, भिडेंच्या अटकेची मागणी करीत बुधवारपर्यंत अटक न केल्यास विधिमंडळाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा पत्रकार परिषदेत दिला.

आव्हाड यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची भेट घेऊन भिडेयांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच भिडेंविरोधात लेखी तक्रारही दिली. भिडे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही, अशी भूमिका घेत आव्हाड यांनी ठिय्या मांडला. अखेर सुमारे दोन तासानंतर पोलिसांनी आव्हाड यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

भिडे अजूनही मोकाट कसे ? : अशोक चव्हाण

महापुरुषांबद्दल गरळ ओकणारे संभाजी भिडे अजून मोकाट कसे? विधिमंळाचे अधिवेशन पुन्हा सुरू होण्याआधी त्याच्याविरोधात ठोस कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली.भिडे अजूनही खुलेआम फिरताहेत, भाषणे देताहेत. त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत, तरीही त्यांना अटक का केली जात नाही, असा सवाल चव्हाण यांनी केला.

Pages