ND Hotel : एन.डी. हॉटेलमध्ये पोलिसांची धाड #ndhotel #chandrapur: - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ND Hotel : एन.डी. हॉटेलमध्ये पोलिसांची धाड #ndhotel #chandrapur:

Share This

खबरकट्टा/चंद्रपूर : अपडेट्स 

अंकित गजानन निलावार,राजेन्द्र महादेव नाईक, लक्ष्मीकांत रामास्वामी कैनकरी अमवार, नरेश भगवान मुन, यशवंत हिरामन रत्नपारखी, विलास सदाशीव खडसे, मयुर भाग्यवान गेडाम, शामराव हिरामन थेमस्कर, अजय मधुकर वरकड यांना जुगार खेळताना काल रात्री रामनगर पोलिसांनी धाड टाकली असता अटक केली.समाजातील पांढरपेशी व्यावसायिक व त्यांची बिघडलेली मुले वाम मार्गाला लागून आपली कौटुंबिक प्रतिष्ठा कशी धुळीस मिळवतात याचे हे उत्तम उदाहरण  आहे. यात निलावार बिल्डर या बड्या नावाचा समावेश आहे. पुढील तपासात अनेक धागेदोरे उलगडतीलच. पण त्या निमित्ताने जिल्ह्यात अनागोंदी माजल्याचे स्पष्ट झाले आहे. 


नागपूर मार्गावरील प्रसिद्ध एन.डी. हॉटेलमध्ये रविवारी रात्री घडलेल्या एका घटनेने शहरात मोठी खळबळ माजवली आहे. रामनगर पोलिसांनी या हॉटेलमध्ये धाड टाकून 15 लाखांपेक्षा अधिकची रोख रक्कम जप्त केली असून, नामांकित बिल्डर गजानन निलावार यांचे पुत्र अंकित नीलावार सहित शहरातील 9 प्रतिष्ठित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. मात्र, या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या आरोपींमध्ये शहरातील आणखी एका अतिशय नावाजलेल्या व्यक्तीचा समावेश आहे.#ndhotel #chandrapur 


रामनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक मधुकर सामलवार यांच्या नेतृत्वाखालील डीबी पथकाने ही धाड टाकली. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास, पोलिसांनी नागपूर रोडवरील एन.डी. हॉटेलच्या रूम नंबर 114 मध्ये धाड टाकली आणि तिथे मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याचे उघड झाले. या धाडीत पोलिसांनी जुगारासाठी वापरलेली साधने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, आणि 15 लाखांपेक्षा अधिकची रोकड जप्त केली.


धाडीत ताब्यात घेतलेल्या 9 व्यक्तींमध्ये शहरातील काही प्रतिष्ठित कुटुंबातील लोकांचा समावेश असल्याचे समजते. त्यात शहरातील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तीचा मुलगा, अंकित निलावार, हे नाव चर्चेत आले आहे. अंकित हा प्रसिद्ध बिल्डर गजानन निलावार यांचा मुलगा असून, रूमची बुकिंग त्याच्याच नावाने करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण शहरात चर्चा सुरू झाली आहे, कारण निलावार कुटुंब शहरातील एक प्रमुख नाव आहे.


या प्रकरणात अजूनही काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे, आणि पोलिसांचा तपास सुरूच आहे. तथापि, या कारवाईमुळे शहरात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत, आणि राजकीय हस्तक्षेपाची शक्यताही नाकारता येत नाही.

चंद्रपूर जिल्ह्यात खून, बलात्कार, विनयभंग अशा कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवीणाऱ्या घटना सतत घडत असताना धनदांडग्यांचे मस्तवाल प्रताप जुगाराच्या माध्यमातून समोर आले आहे. चंद्रपूरातील एन डी हॉटेल मध्ये पोलिसांनी नुकतीच धाड टाकून जुगाराचा पर्दाफाश केला. नामांकित बिल्डर गजानन निलावार यांचा मुलगा अंकित सह 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 15 लाखांची रोकड आणि अन्य उपकरणे देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे. 

समाजातील पांढरपेशी व्यावसायिक व त्यांची बिघडलेली मुले वाम मार्गाला लागून आपली कौटुंबिक प्रतिष्ठा कशी धुळीस मिळवतात याचे हे उत्तम उदाहरण  आहे. यात आणखी एका बड्या नावाचा समावेश आहे. पुढील तपासात अनेक धागेदोरे उलगडतीलच. पण त्या निमित्ताने जिल्ह्यात अनागोंदी माजल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ज्या एन डी हॉटेल मध्ये हे प्रकरण घडले ते एन डी हॉटेल राजकीय घडामोडीसह अनेक अप प्रकारांचे साक्षीदार ठरले आहे. हे देखील विशेष महत्वाचे आहे. आता धन दांडग्यांचे हे प्रकरण पोलिस शेवटापर्यंत नेतात की राजकीय दबावाने या प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात जाते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Pages