चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांच्या उपोषणाला भेट देण्यास गेलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची जीभ घसरली व आपल्या भाषणात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा एकेरी उल्लेख करत अतिशय निम्न दर्जाची भाषा वापरत टीका टिप्पणी केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांनवर फिरत आहे.
लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधातले जनमत आणि कुणबी समाजाचे समर्थन या बळावर विजयी झाल्याने आपण कसेही बोलू शकतो असा साक्षात्कार धानोरकर यांना झाल्याची कुजबुज खुद्द काँग्रेस पक्षात ऐकायला मिळत असून काहीच दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी तिकीट वाटपवरून झिडकारले होते.#pratibhadhanorkar #congress
बघा प्रतिभा धानोरकर यांचा हा व्हिडीओ 👇👇
मुनगंटीवारला सत्तेची मस्ती चढली आहे.त्याचा माज आपण लोकसभेत उतरवला आहे, उरलेला माज विधानसभेत उतरवा अशी मुक्ताफळे उधळत त्यांनी मुनगंटीवार यांच्या वर तोंडसूख घेतले. कंत्राटी कामगारांना सेवेत कायम न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यास कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करण्याचे आश्वासन देऊन खासदार धानोरकर यांनी टाळ्या देखील मिळविल्या.#sudhirmungantiwar #cstps
मुळात जे कंत्राटी कामगार उपोषणास बसले आहेत त्यांचा प्रमुख हा काँग्रेसचा पदाधिकारी आहे, त्यामुळे स्वाभाविक पणे या आंदोलनाला राजकीय दर्प नक्कीच आहे. सिटीपीएस कंत्राटी कामगारांच्या अनेक मागण्यांची पूर्तता पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या माध्यमातून आधीही झाली आहे. शासनाच्या दृष्टीने ज्या मागण्या अव्यहार्य आहेत त्या प्रलंबित आहे त्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
त्याचा राजकीय लाभ मिळावा यासाठी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे नेते धडपडत आहे हे स्पष्ट आहे. मंचावर ठाकरे गटाचे संदीप गिऱ्हे यांची उपस्थिती पुरेशी बोलकी आहे. राजकीय क्षेत्रात आपली भूमिका मांडणे, सत्ताधारी मंडळीचा विरोध करणे अपेक्षित असते व ते गैर देखील नाही. पण व्यक्त होण्याची पद्धत देखील तेवढीच सकारात्मक असणे गरजेचे आहे.
लोकप्रतिनिधीची भाषा ही समाजासाठी मार्गदर्शक असावी, सुसंस्कृत असावी अशी अपेक्षा समाजाची असते. त्यांच्या अर्वाच्च उदगारांना त्या क्षणी टाळ्या मिळाल्या असल्या तरी उद्या हे आपल्यावर बुमरँग होऊ शकते याची कल्पना त्यांना नसावी. एक मात्र खरे की एक विजय राजकारणाचा स्तर घसरवू शकते.