गोंडवाना विद्यापीठाव्दारे घेण्यात आलेल्या उन्हाळी २०२४ परिक्षेचा निकाल लागल्यावर आलेल्या निकालाचे पुर्नमुल्यांकनाचे आवेदन विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश विभागाचे निकाल हे दि. १७.०९.२०२४ रोजी लागले. परंतू संबंधीत पुर्नमुल्यांकनाच्या निकालात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेण्याकरिता महाविद्यालयात गेले असता दि. १४.०९.२०२४ ही प्रवेशाची अंतिम दिनांक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अश्या तक्रारी विद्यार्थ्यांमार्फत १९/९/२४ सूरज भाऊ पेदुलवार यांना संपर्क करून कळवण्यात आल्या तात्काळ सदर विषय मा.ना. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या लक्षात आणुन दिल्या त्यांनी या विषयाची तत्काळ दखल घेत विद्यापीठ प्रशासनाला सुचना केल्या व विद्यापीठाने विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत … शैक्षणिक सत्र २०२४-२५ प्रवेशासाठी ३०/०९/२०४ पर्यंतची मुदतवाढ दिली आहे.
सुरज पेदुलवार यांच्या समयसूचकता बघता त्यांनी कोणत्याही विद्यार्थी च शैक्षणिक वर्षात नुकसान होऊ दिले नाही विद्यार्थ्यांनी याची दक्षत घ्यावी तसेच कोणतेही महाविद्यालय सदर वेळेत प्रवेश नाकारत असेल तर माझ्याशी संपर्क साधावा