खबरकट्टा / चंद्रपूर :
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे विदर्भातील 11 जिल्हात संवाद सभा आयोजित करणे तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सातत्याने आंदोलने ,अन्नत्याग आंदोलने मोर्चे काढून सरकारवर दबाव वाढवून सरकार कडून विविध मागण्या मान्य करून घेतल्या व काही मागण्या प्रलंबित असून यावर विचार मंथन करणे तसेच महासंघाच्या संघटनात्मक बाबीवर चर्चा करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा 29 सप्टेंबर 2024 ला रोज रविवारला धनवटे नॅशनल कॉलेज येथिल मातोश्री विमलाताई देशमुख सभागृह ,अजनी रेल्वे स्टेशन जवळ नागपूरला दुपारी 12.30 वाजता ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे.
सभेत केंद्र व राज्य सरकारशी संबंधित मागण्यांवर विचार विनिमयआणि दिनांक 4 ऑक्टोंबर ते 9 ऑक्टोंबर 2024 पर्यंत होणाऱ्या विदर्भातील 11 जिल्हात संवाद सभा आयोजनावर चर्चा केली जाईल.
सभेला राष्ट्रीय ओबीसी महासंघ, महिला महासंघ, किसान महासंघ, युवा/युवती महासंघ, विध्यार्थी महासंघ, कर्मचारी महासंघ, वकील महासंघ सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी काढलेल्या प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.