खबरकट्टा / नागपूर :
केंद्र व राज्य शासनाने गेल्या वर्षभरापासून घेतलेल्या निर्णयांची माहिती देणे. २४ सप्टेंबर २०२४रोजी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये ४ऑक्टोबर ते ९ऑक्टोबर या कालावधीत संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे म्हणाले की, सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती अजूनही समाजापर्यंत पोहोचलेली नाही.
ही माहिती संवाद सभेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल.२४सप्टेंबर २०२४रोजी च्या परिपत्रका मुले लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्याबद्दल त्यांचे आभारही मानले जातील.संवाद सभा गडचिरोली जिल्ह्यातून ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या यात्रेचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर करणार असून, गोदिया, भंडारा, वर्धा, खामगाव, वाशीम, यवतमाळ, वणी, चिमूर मार्गे ९ ऑक्टोबरला नागपुरात समारोप होणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून आता पर्यंत संघटनेने केलेल्या कामाचा आढावा मांडला ,ज्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात ओबीसी मुद्द्याचे समर्थन केले जाईल, त्या पक्षांचे ओबीसी महासंघ स्वागत करेल.
डॉ तायवाडे म्हणाले की, महासंघ संविधानाच्या मर्यादेत राहून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारशी लढा देत आहे. यापुढील काळातही संघर्ष सुरूच राहणार आहे. जात जनगणना हा आपला मुख्य मुद्दा आहे. आता देशातील विरोधी पक्षनेत्यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला आहेत.हे ओबीसींसाठी हे चांगले लक्षण आहे. ओबीसी कोट्यातील मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत ते म्हणाले की, सरकारने त्यांना लेखी आश्वासन दिले आहे.त्यामुळे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून कधीच आरक्षण मिळू शकत नाही. ते म्हणाले की, महासंघात सर्व राजकीय पक्षांचे सदस्य समाविष्ट आहेत. सर्वांना या संवाद यात्रेत आमंत्रित केले आहे.
ज्या राजकीय पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील प्रमुख जाहीरनाम्यात ओबीसींच्या हिताचे मुद्दे असतील त्या पक्षासोबत ओबीसी समाज राहील. सभेला शाम लेडे, प्रकाश साबळे, शरद वानखेडे, सुभाष घाटे, गुनेश्वर आरिकर, ओबीसी योद्धा रवींद्र टोगे ,सुषमा भड, ज्योती ढोकणे, रत्नमाला पिसे, रेखाताई बाराहाते,, उपस्थित होते, या सभेला गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, लातुर , हिंगोली,जालना, गोंदिया, भंडारा, याठीकानाहुन प्रमुख, महिला ,युवक, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचलन रुषभ राऊत यांनी केले.
तसेच कार्यक्रमाचे आभार निलेश कोडे यांनी केले, बैठकीच्या यशस्वते साठी, प्रा, शिंदे,विजय डवांगे ,राजू चौधरी, रामदास कामडी ,विजय पिनाटे, प्रा. उमेश शिंजनगुडे,राहुल, लक्षे, मांगे सर, भाऊ, आसुटकर,कवडू लोहकरे,विनोद हजारे, दिलीप हरणे, सूरज बेलोकर,राहुल भांडेकर,रुपेश राऊत, घनश्याम अकोले, आणि इतरांनी सहकार्य केले.