डोळे येऊ नये म्हणून घरातच करा हा साधा उपाय, काय आहे आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला? #eyeflue - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



डोळे येऊ नये म्हणून घरातच करा हा साधा उपाय, काय आहे आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला? #eyeflue

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

डोळे येऊ नये म्हणून आपली आजी अनेक उपाय करत होती. मात्र, आपण ते विसरत चाललो आहोत. डोळे येण्याची साथ आता सर्वत्र सुरू आहे. डोळे आले नसतील तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक गोष्ट करता येऊ शकते.

धूर करायचे म्हणजे घरात खूप धूर करायचे असे नाही. मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून याचा वापर होईल. डोळे येणे म्हणजे डोळे लाल होणे, त्यातून पिवळा असा पदार्थ बाहेर येणे, खाज सुटणे, डोळे लाल होणे होय. सध्या ही साथ सर्वत्र पसरली असून दुकानात डोळ्यांच्या औषधांचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे डोळे येण्यापासून बचाव होण्यासाठी हा घरघुती उपाय करणे अत्यंत आवश्यक राहणार आहे. यामुळे घरातील कुणालाही त्रास होणार नाही.

आयुर्वेदिक डॉक्टर विराज गीते यांनी सांगितले की, एका वाटीमध्ये कापूर घ्यायचे आहे. त्यासोबत लसन लागणार आहे. लसनाच्या बाहेरचे साल काढून घ्यायचे आहे. हे लसनाचे साल आणि कापूर पेटवायचा आहे. यापासून धूर निघणार आहे. हा धूर डोळ्यामध्ये गेल्याने आराम होतो. याशिवाय लहान मुलांचे डोळे आल्यास गाजर आणि पालक याचा रसही देता येऊ शकतो. पालकचा रस मुलांना देता येईल. तसेच गाजरचा रसही घेता येईल. यामुळे डोळे आल्यास आराम वाटेल.

Pages