मध्यरात्री घरासमोरील वाहन जळून खाक ; अपघात की घातपात? #chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मध्यरात्री घरासमोरील वाहन जळून खाक ; अपघात की घातपात? #chandrapur

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर :

चंद्रपूर :- शहरातील घुटकाळा वार्डात मध्यरात्री घरासमोर उभी असलेली ऍक्टिव्हा दुचाकी वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली, सदर वाहनाला आग लागली की लावण्यात आली ? याचा शोध चंद्रपूर शहर पोलीस घेत आहेत.

शहर पोलीस स्टेशन हद्दीत, घुटकाळा वार्डातील नेहरू चौक येथे राहणाऱ्या कल्पना सुधीर ढोरे आपल्या परिवारासह घरी झोपले असता मध्यरात्री काही तरी जळल्याचा वास आल्याने घराबाहेर निघून बघितले असता त्यांच्या मालकीची होंडा ऍक्टिव्हा क्र MH 34 AX 9948 ही जळत असल्याचे आढळले, दरम्यान कुटुंबातील सदस्यांनी मिळून गाडीवर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत गाडी पूर्ण जळून खाक झाली आणि शेजारी असलेली ऍक्टिव्हा 5G क्र.ही सुद्धा काही प्रमाणात जळाली.

ढोरे कुटुंबियांनी रात्रो शहर पोलीस स्टेशन गाठत घटनेची तक्रार दाखल केली असून, शहर पोलीस तपास करीत आहेत.ऍक्टिव्हा दुचाकीला मध्यरात्री 2 ते 2:30 च्या दरम्यान अचानक आग कशी लागू शकते ? शॉर्टसर्किट किंव्हा वायरिंग जळल्याने वाहनाला आग लागली असती तर मागचे चाक सुद्धा जळाले असते ? त्यामुळे वाहनाला आग आपोआप लागली नसून आग लावण्यात आली आहे असा संशय ढोरे कुटुंबियांनी केला.शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांनीही घटनास्थळी भेट दिलीसदर वाहन जळल्याच्या प्रकारामुळे परिसरात शंका - कुशंका, संशय व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pages