होय, आम्ही समलिंगी आहोत! चंद्रपूर शहरात भव्य मिरवणूक Yes, we are #gay! Grand procession in Chandrapur city - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



होय, आम्ही समलिंगी आहोत! चंद्रपूर शहरात भव्य मिरवणूक Yes, we are #gay! Grand procession in Chandrapur city

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :#khabarkatta 

तृतीयपंथींना प्रेम करण्याचा अधिकार असून लग्न करून एकत्र राहता येते. तृतीयपंथींयाना समाजात सन्मानाची व समान वागणूक मिळावी यासाठी संबोधन ट्रस्ट संस्थेच्या वतीने चंद्रपूर शहरात भव्य रॅली काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तृतीयपंथीयांनी हातात ‘मला गर्व आहे मी तृतीयपंथीय असल्याचा’ , ‘प्रेम हे प्रेम असतं’ असे फलक घेऊन सर्वांचे लक्ष वेधले.

तृतीयपंथीयांनासुध्दा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांनासुध्दा प्रेम करण्याचा, विवाह करण्याचा अधिकार आहे. हैदराबादमध्ये एक तृतीयपंथी जोडपे बाळास जन्म देणार आहे. त्यामुळे समाजाचा तृतीयपंथीयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.#Tertiary

आज 25 जानेवारीला शहरातील मुख्य मार्गाने थिरकत भर उन्हात भव्य रॅली काढण्यात आली.तृतीयपंथींच्या फलकांनी चंद्रपूर शहरातील नागरिकांचे लक्षे वेधून घेतले. समाजाचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून येणाऱ्या काळात त्यांना नागरिकांकडून सन्मानाची वागणूक मिळेल असा विश्वास आशा राज काचोळे यांनी व्यक्त केला.#khabarkatta 

Third parties have the right to love and can marry and live together. A grand rally was held in Chandrapur city on behalf of the Sambodhan Trust organization to create awareness among the citizens so that the third parties get respect and equal treatment in the society. The third-party people held placards saying 'I'm proud to be a third-party', 'Love is love' and drew everyone's attention.

Third parties also have the right to live with dignity. They also have the right to love and marry. A third-party couple is about to give birth to a baby in Hyderabad. Therefore, it was appealed to change the attitude of the society towards the third party.#khabarkatta

Today on January 25, a grand rally was held on the main road of the city under the scorching sun.The placards of the third parties attracted the attention of the citizens of Chandrapur city. Asha Raj Kachole expressed the belief that society's attitude towards third parties is changing and they will be treated with respect by the citizens in the coming time.



Pages