औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) भारतीय स्टेट बँकेचे लॉकर तोडून 14 लाखांचा धाडसी दरोडा प्रकरणी पोलिसांनी चुलत भाऊ असलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे तपासकार्यात व्यत्यय नको म्हणून गुप्त ठेवण्यात आली आहेत. सीसीटीव्ही डीव्हीआरसोबत घेऊन गेलेले चोरटे चारचाकी वाहनावरील एका वाक्यामुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
चंद्रपूर-घुग्घुस मार्गावरील एमआयडीसीतील भारतीय स्टेट बँकेत गत आठवड्यात शनिवार व रविवार अशा सलग दोन सुट्या बघून दरोडेखांरांनी दरोडा घातला. सोमवारी सकाळी बॅंक पूर्ववत सुरु होताच अधिकारी व कर्मचाऱ्यांना बँकेच्या आतील लॉकर तोडलेले दिसले. चोरट्यांनी अनेक दिवसांपासून या बॅंकेवर पाळत ठेवली होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दरोड्याची घटना येणार नाही, याची काळजी या चोरट्यांनी घेतली.
त्यामुळे आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे कुठे लागले आहे, याची इंत्यभूत माहिती चोरट्यांना होती. त्यामुळे बॅंक परिसरात प्रवेश करताच आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर त्यांनी एक विशिष्ट प्रकारच्या द्रव्याची फवारणी केली. खिडकी तोडून आत गेले. गॅस कटरने लॉकर तोडले. या गडबडीत लॉकरमधील काही नोटासुद्धा जळाल्या.
बॅंकेतील सुरक्षा यंत्रणा आधी बंद केली. त्यामुळे लॉकर सहजरित्या त्यांनी गॅस कटरने कापले. त्यातील चौदा लाख रुपये घेऊन ते पसार झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज संग्रहीत यंत्रणाही स्वतःसोबत घेऊन गेले.
कोणताही सबळ पुरावा पोलिसांच्या हाती नव्हता. त्यामुळे आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर चार दिवसानंतर दोन आरोपी पोलिसांना लागले. ते चंद्रपूर शहरातीलच असल्याचे समजते. मात्र त्यांच्या नावाबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली आहे. यात बॅंक फोडी प्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.
चोरट्यांनी बॅंक फोडली. तिथली सुरक्षा यंत्रणा आपल्या ताब्यात घेतली. बॅंकेतील सीसीटीव्ही आणि डिव्हीआर सुद्धा पैशासोबत घेवून गेले. त्यामुळे पोलिसांच्या हाती लागणार नाही, असा विश्वास चोरट्यांना होता. परंतु या बॅंक परिसरातील मार्गावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. याची कल्पना चोरट्यांना नव्हती. नेमकी तिथेच चूक झाली.
पोलिसांनी आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा घटना घडल्यानंतर एक संशयास्पद वाहन या मार्गाने रात्री वारंवार गेल्याचे दिसून आले. या चारचाकी वाहनावर समोरच्या काचावर एक वाक्य लिहीले होते. हेच वाक्य पोलिसांना आरोपीपर्यंत घेवून गेले. या वाहनाचा पोलिसांनी शोध घेतला आणि पहिला आरोपी हाती लागला. त्यानंतर दुसऱ्याला अटक केली.पहिला अटकेतील आरोपी या वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. दोन्ही अटकेतील आरोपी चुलत भाऊ आहेत अशीही माहिती पोलिसांनी दिली.
The police have arrested two accused, who are cousins, in the case of a daring robbery of Rs.14 lac. The names of the accused in this case have been kept secret so as not to disturb the investigation. Thieves carrying a CCTV DVR were caught in the police net by a sentence on a four-wheeler.
The robbers robbed the State Bank of India in MIDC on Chandrapur-Ghugghus road last week on two consecutive weekends. On Monday morning, as the bank started to recover, the officers and employees found the lockers inside the bank broken. Thieves had kept surveillance on this bank for many days. Therefore, these thieves took care that the incident of robbery will not be recorded in the CCTV footage.
Therefore, the police have to make concerted efforts to find the accused. Thieves had intimate knowledge of where the CCTV cameras were installed. So, as soon as he entered the bank premises, he first sprayed a specific type of liquid on the CCTV camera. He broke the window and entered. Lockers were broken with gas cutters. In this commotion, some notes in the locker were also burnt.The security system in the bank was closed earlier. So he easily cut the locker with a gas cutter. They fled with fourteen lakhs of rupees. He also took the CCTV camera footage storage system with him.
The police did not have any strong evidence. Therefore, the police had to make concerted efforts to find the accused. Finally, after four days, the two accused approached the police. It is believed to be in Chandrapur city itself. But the police has kept secret about his name. The police is searching for some more accused in the bank robbery case.
Thieves broke the bank. The security system there took over. The bank's CCTV and DVR were also taken along with the money. Therefore, the thieves believed that they would not be caught by the police. But there are many CCTVs on the road around this bank area. Thieves had no idea of this. That's exactly where it went wrong.
The police checked the CCTV footage of the surrounding area. After the incident, it was seen that a suspicious vehicle frequently passed this way at night. A sentence was written on the front glass of this four-wheeler. This sentence led the police to the accused. The police searched the vehicle and arrested the first accused. Then another was arrested.The first arrested accused was working as a driver of this vehicle. The police also informed that the accused in both the arrests are cousins.