पेट्रोल डिझेलच्या आवाक्या बाहेर गेलेल्या दरामुळे घरगुती सिलेंडरमधून वाहनामध्ये गॅस भरला जातो. या अवैध गॅस भरण्याच्या प्रकारामुळे अनेकदा अपघात होतात. वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरात आज शासकीय रुग्णालयाच्या बाजूला ओमनी कारमध्ये घरगुती सिलेंडरमधून गॅस भरताना अचानक कारने पेट घेतला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ही गाडी कुणाची आहे, कशामुळे आग लागली, या संदर्भात पोलिसांकडून शोध सुरू आहे.
मंगरूळपीर शहरातील शासकीय रुग्णालयाच्या बाजूला ओमनी कारमध्ये घरगुती सिलेंडर लावून गॅस भरण्यात येत असताना अचानक गाडीने पेट घेतला. बघता बघता आग वाढल्याने गाडी जाळून राख झाली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरपेक्षा (१४.२ किलो) व्यावसायिक सिलिंडर महाग आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर वाहनात केला जात आहे. अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर असे प्रकार सर्रास सुरू आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Beware! Car caught fire while filling gas from domestic cylinder; Fortunately, there was no loss of life
Due to the unaffordable price of petrol diesel, the vehicle is filled with gas from domestic cylinders. Accidents often occur due to this type of illegal gas filling. In Mangrulpir town of Washim district today, the car suddenly caught fire while filling gas from a household cylinder in an omni car near the government hospital. Fortunately, there was no loss of life. The police are investigating the cause of the fire and whose car it belongs to.
The omni car suddenly caught fire when it was being filled with gas by using a household cylinder near the government hospital in Mangrulpir city. As the fire spread, the car was burnt to ashes. Fortunately, there were no casualties. As soon as the information was received, the police reached the spot.
Commercial cylinders are more expensive than domestic LPG gas cylinders (14.2 kg). Therefore, domestic gas cylinders are being illegally used in vehicles. Such practices are rampant at illegal gas refilling centers. The police administration is demanding to pay attention to this and take action in time.
हेही वाचा : SBI बँक दरोडा : गाडीवर लिहिलेले एक नाव आणि मास्टर प्लॅन चा उलगाडा ! दोन चुलत भावांना अटक