सोन्याला पालीश करुन देतो म्हणुन दोन अज्ञात इसमांनी साडेतीन तोळे सोने पळविले...#Run away with the gold - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सोन्याला पालीश करुन देतो म्हणुन दोन अज्ञात इसमांनी साडेतीन तोळे सोने पळविले...#Run away with the gold

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
घटना दिनांक 23रोज गुरुवारला दुपारी 1वाजताच्या दरम्यान शहरातील नागसेन नगर येथे घडली या घटनेची तक्रार भद्रावती पोलीसात करण्यात आली असुन त्यांनी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.दुपारच्या वेळेस एका काळ्या रंगाच्या एका दुचाकी गाडीने दोन अज्ञात इसम नागसेन नगर येथे आले.व त्यांनी मारोती बोरकर यांना सोन्याला पालीश करुन देतो म्हणुन त्यांचेकडून साडेतीन तोळे सोने हस्तगत केले.व मोटरसायकलने पसार झाले.या दोन इसमांपैकी जाड असलेल्या इसमाने आकाशी रंगाचा शर्ट व निळा पैंट तर दुसऱ्या सडपातळ इसमाने पांढरा शर्ट व काळा पैंट परिधान केला होता.हे चोरटे सिसी टिव्ही कैमर्यात कैद झाले असुन भद्रावती पोलीस फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे.
दरम्यान ठाणेदार इंगळे यांनी नागरिकांनी अज्ञात इसमांना घरात येऊ देऊ नये व त्यांच्याशी कोणताही व्यवहार करु नये असे आवाहण केले आहे.या अज्ञात चोतट्यांना पकडण्याचे आव्हाण नवे ठाणेदार इंगळे यांच्यासमोर आहे.घटनेचा तपास ठाणेदार इंगळे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस करीत आहे.#chandrapur bhadrawati


Pages