7 हजार रुपयांची मंडळ अधिकारी बुराडे यांना अटक :लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर ची कारवाही #acb - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



7 हजार रुपयांची मंडळ अधिकारी बुराडे यांना अटक :लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर ची कारवाही #acb

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर -

जमिनीचे फेरफार करण्यासाठी शंकरपूर चिमूर येथील मंडळ अधिकारी यांनी 7 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, या प्रकरणी मंडळ अधिकारी बुराडे यांना लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर ने अटक केली आहे. Bribe

फिर्यादी हे मौजा डोंगरगाव येथील रहिवासी असून आजोबांच्या नावे असलेल्या जमिनीचे त्यांच्या मृत्यू पत्रानुसार फेरफार करायची होती, यासाठी त्यांनी मंडळ अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता.

मात्र सदर काम करण्यासाठी मंडळ अधिकारी धनंजय बुराडे यांनी सदर काम करून देण्यासाठी 7 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

बुराडे यांच्यासोबत कोतवाल राहुल सोनटक्के, तलाठी कार्यालय किटाळी, चिमूर यांचा ही या प्रकरणी सहभाग होता, दोघांनी तडजोडीअंती 5 हजार रुपयांची लाच मागितली.
मात्र फिर्यादीला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत विभाग येथे तक्रार दिली.

तक्रार प्राप्त झाल्यावर 17 व 18 फेब्रुवारीला लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी केली, दोघांनी लाचेची मागणी केल्याची बाब स्पष्ट झाल्याने लाचलुचपत विभागाने दोघांविरुद्ध भिसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार कारवाई सुरू करण्यात आली आहे. Bribery crime

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले व कार्यालयीन स्टाफ रोशन चांदेकर, संदेश वाघमारे, राकेश जांभुळकर, अमोल सिडाम व सतीश सिडाम यांनी केली.

Pages