राष्ट्रीय अनुसूचित जाती, जमाती आयोगासमोर ( National Commission for Scheduled Castes and Tribes) चंद्रपूर जिल्ह्यातील एका प्रकरणात साक्षीसाठी सुनावणीस हजर राहण्यास समन्स बजावले होते, परंतु चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा (Chandrapur Collector Vinay Gowda) हे हजर न झाल्याने त्यांचे विरोधात अटक वॉरंट (Arrest warrant) जारी केल्यानंतर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवाय मा. 16 फेब्रुवारी मा. आयोगा समोर उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण) उपस्थित असल्याची माहिती दिली आहे.#khabarkatta
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुंबी येथील आदिवासी शेतक-यांच्या जमिनी अवैधरित्या अतिक्रमण केल्याबाबत राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे तक्रार केली होती. ही तक्रार चुनखडक उत्खननाबाबत होती. सदर उत्खननास महाराष्ट्र शासनाने 30 एप्रिल 1979 चे आदेशान्वये मंजूरी दिलेली होती. या अनुषंगाने 03. फेब्रुवारी 2023 रोजी उपस्थित राहण्याबाबत समन्स प्राप्त झाला होता. सदर समन्सचे अनुषंगाने 16 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 4.00 वाजता राष्ट्रीय अनुसूचित जन जाती आयोग, नवी दिल्ली येथे उपस्थित राहावयाचे होते. परंतू काही अपरिहार्य कारणामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही.#khabarkatta
या बाबत आयोगाला 13 फेब्रुवारी 2023 पत्राद्वारे कळविण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण) यांना सदर समन्सचे अनुषंगाने उपस्थित राहण्याबाबत प्राधिकृत करण्यात आलेले होते. त्याबाबत आयोगाला अवगत केले होते. 16 फेब्रुवारी 2023 रोजी उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण) आयोगासमोर हजर झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली.#khabarkatta