मान - धनाचा अभाव : काँग्रेसचे प्रचार नियोजन बिघडले; नुसतीच हवा; कार्यकर्ते - मतदारांमध्ये नाराजीचा सूर #congress - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मान - धनाचा अभाव : काँग्रेसचे प्रचार नियोजन बिघडले; नुसतीच हवा; कार्यकर्ते - मतदारांमध्ये नाराजीचा सूर #congress

Share This
खबरकट्टा / चंद्रपुर :

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा तिच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज (दि.17) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. भारतीय जनता पार्टी व काँग्रेस पक्षात थेट लढत दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडी या लढतीत सुरंग लावण्याचे काम करीत आहे. भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक वगळता इतर पक्षाच्या स्टार प्रचारकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

सुरवातीपासूनच लोकसभा प्रचारात काँग्रेस पक्षाची हवा दिसून आली. पण काँग्रेसचे नियोजन व्यवस्थित नसल्याने आता ही हवा ओसरायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी "मान आणि धन या दोन्ही चा अभाव" दिसल्याने नाराजीचा सुर आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत न घेतल्याने घटक पक्षातील पदाधिकारी नाराज आहेत. नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर घटक पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना साधा एक कॉल गेला नाही, अशीही चर्चा आहे.

निव्वळ बॅनरबाजी व सोशल मीडियावर भर देण्यात आला आहे. काँग्रेसकडून एकही मोठी सभा या क्षेत्रात लागली नाही. त्यामुळे काँग्रेसचे आगामी ध्येय-धोरण व केंद्रात सत्ता प्रस्थापित करण्याबाबतची स्ट्रेटेजी मतदारांपर्यंत पोहोचली नाही. केवळ आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू राहिल्या मात्र निवडून आल्यानंतरचा लोकसभा क्षेत्राबाबत विकासाचा रोडमॅप काँग्रेस उमेदवाराने कोणत्याही भाषणात सांगितला नाही. बेरोजगारी दूर करण्याचा मास्टर प्लान सांगितला नाही. शेती व शेतकरी विकास धोरण कसे राबविले जाईल याबाबत चर्चा झाली नाही. भाषणात ग्रामीण विकासावर शब्द निघाले नाही. केवळ आरोप-प्रत्यारोप व संविधान बचाव, लोकशाही विरुध्द हुकुमशाही याच भोवती प्रचार भाषणे सुरु राहिली.

शपथपत्रात दाखविल्यानुसार काँग्रेस उमेदवाराने बिजेपीच्या काही व्यक्तींकडून हातउसने कर्ज घेतले आहे. त्यामुळे बिजेपीच्या काही गोटात काँग्रेस उमेदवाराचे संबंध असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब पक्षाच्या वरीष्ठ मंडळींकडे पोहोचली असल्याचेही सांगण्यात येत आहे. म्हणून काँग्रेस कडून कोणताही स्टार प्रचारक लोकसभा क्षेत्रात न आल्याचे बोलले जात आहे. तसेच वरोरा येथे टेमुर्डे व देवतळे गट, मुल येथे रावत गट, राजुरा येथे वामनराव चटप, वणी येथे राजु उंबरकर, यांची स्पष्ट नाराजी दिसून येत आहे.

गेल्या पंचवार्षिक काळात काँग्रेसने अनेकांना नाराज केले. 2019 च्या लोकसभेत ज्या व्यक्तींनी काँग्रेस साठी काम केले ते नंतर नाराज झाले. स्व. एड. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या मुळे त्यावेळी काँग्रेस पक्षाची तिकीट मागील खासदारांना मिळाले होते. मात्र नंतर त्यांनाच वाईट अनुभव आले. दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. हाच प्रकार जिल्हा बँकेच्या माध्यमातून संतोष रावत यांचे सोबत घडला. 2019 च्या लोकसभेत काँग्रेस सोबत राहूनही काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या जिल्हा बँकेवर मागील खासदार व आमदारांनी अनेक आरोप केले. शेतकरी कल्याण निधी योजना बंद करण्यास भाग पाडले. जिल्हा बँकेतील नोकर भरती थांबविली. त्यामुळे संतोष रावत सुध्दा नाराज आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते वामनराव चटप हे काँग्रेस उमेदवारांच्या सोबत होते, यावेळी त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याकरीता विदर्भ विकास पार्टी कडून स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उभा ठेवला आहे. शिवाय 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चटप यांची धानोरकर कडून फसवणूक झाल्याने ते आता अधिक अलर्ट मोड वर आहेत.

वणी-आर्णी विधानसभा क्षेत्रात मागील खासदारांनी कोणतेच विकास कामे किंवा फारसा निधी न दिल्याने, मागील खासदारांनी काय केले? हा प्रश्न तेथील मतदार विचारत आहे. वरोरा विधानसभा क्षेत्रात प्रचंड नाराजी आहे.शिवाय घटक पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या प्रचार तोफा याचा मान-धनाच्या आभावमुळे व गरज नाही-आवश्यकता नाही-झालेले आहे या त्रिसूत्री मुळे त्रस्त आहे. मतदानाचा दिवस उदया परवा वर आला तरी उमेदवारांच्या स्वभावातून मान व हाथातुन धन सुटत नसल्याचा परिणाम पंजावर होईल असाच प्रचार-प्रसार हे घटक पक्ष जास्त करत आहेत.

शिवसेना (उबाठा)सारख्या महाविकास आघाडीचे मुख्य घटकाचे दोन्ही जिल्हा प्रमुख सर्व मोठ्या सभांना उपस्थित दिसत नाहीत फक्त काय ते गावात फोटो काढून मातोश्री वर सेंड करण्यापूरते इच्छुक दिसत आहेत. राष्ट्रवादी च्या मुख्य नेत्यांनी उमेदवारी अर्ज रॅली च्या हिशोबानंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रचारातून काढता पाय घेतला.आप ने भरपूर जोर लावला असला तरी पाहिजे तसा उत्साह आता दिसत नाहीये.
वरोरा विधानसभेत सुद्धा महाविकास आघाडीच्या मुख्य घटक असलेल्या उबाठा गटाचे रवींद्र शिंदे सुद्धा नाराज असून शिंदे यांनी धानोरकर गटाला अनेक निवडणुका मध्ये पराभूत केले असल्याने त्यांचे मनधारणी करणे गरजेचे होते,मात्र तसेही झाले नाही.उलट शिवसेना कार्यकत्याना आर्थिक आमिष देण्याचे काम केले पण ते बळी पडले नाही.उलट शिदे यांनी पक्ष पदअधिकारी व शिवसैनिकांना पक्षाशी प्रामाणीक रहा असे सांगितलें जरी तरीही उत्साह दिसत नाही.

आधी कॅाग्रेस उमेदवाराला भेट घ्या असा सल्ला दिला असता  त्याची गरज नाही असे आवर्जुन त्यांना प्रचारात असणा-या नेत्याना काँग्रेस उमेदवारांनी सुनावले.आता मात्र चंद्रपूर शहरात 2019 चां निवडणुकीत जोर्गेवारांनी काँग्रेसला भरगोस मदत केली होती, काल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने शहरातील संतुलन राखण्याकरीता सुभाष धोटे यांच्या सल्ल्याने धावपळीत नंदू नागरकर यांची धानोरकर यांनी भेट घेतल्या नंतरही त्यांच्या कुटुंबासमोर झालेल्या रडगाण्याचा कार्यक्रमाचा आता मतदानाला एक दिवस उरले असताना विशेष उपयोग दिसून येत नाही.त्यामुळे एकंदरीत मान-सन्मानाचा विषय ऐरनीवर आला आहे.

शिवाय काल सुभाष धोटे जिल्हाध्यक्ष काँग्रेस यांनी पत्रकार परिषद घेत मोठ्या ग्राउंड न मिळू दिल्या मुळे प्रियांका गांधी यांची सभा घेता आली नाही असे जरी म्हटले तरीही चंद्रपुरात ग्राउंड न मिळाले तरी वरोरा किंवा वणी येथेही मोठी सभा घेता आली असती असे कार्यकर्त्यांचे मत चर्चेत होते. शिवाय कन्हेया कुमार यांच्या सभेत खुद्द उमेदवार धानोरकर यांनी "मोठ्या सभा घेण्याची आमची कॅपॅसिटी नाही "असे प्रतिपादन केल्याने सगळे आवक झाले होते. म्हणून आता नियोजनाच्या आभावमुळे काँग्रेस ची नैसर्गिक हवा जरी असली तरी ती मतपेटीत कॅश होईल, असे सध्या तरी वाटत नाही.

Pages