पुन्हा हाल्फ मर्डर : शिवसेना (उबाठा ), वाहतूक सेना चंद्रपूर विभाग जिल्हाप्रमुख /वाळू तस्कर स्वप्नील काशीकर वर गुन्हा दाखल #sandip-girhe - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पुन्हा हाल्फ मर्डर : शिवसेना (उबाठा ), वाहतूक सेना चंद्रपूर विभाग जिल्हाप्रमुख /वाळू तस्कर स्वप्नील काशीकर वर गुन्हा दाखल #sandip-girhe

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर :

शिवसेना (उबाठा ), वाहतूक सेना चंद्रपूर विभाग जिल्हाप्रमुख स्वप्नील काशीकर यांनी आपल्या सहकारी यांना घेऊन गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा वाळू घाटावरचे अवैध वाळू उत्खनन बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तारडाचे सरपंच तरुण गंगाराम उमरे, तमुस अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर लखमापुरे यांच्यावर जीवघेना हल्ला केला असून त्यात उमरे हे गंभीर जखमी झाले आहेत.

सदर वाळू तस्करी प्रकरणी गोंडपिपरी पोलिसांनी कलम 307 व इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले असून - साहिल सय्यद, वैभव पेंडसे यांना - अटक केली आहे. दरम्यान स्वप्नील काशीकर व इतर पाच ते सहा आरोपी फरार असून त्यांचा शोध गोंडपिपरी पोलीस घेत आहे.

या हल्ल्यात जखमी पैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर वळणावर आल्याने जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

जिल्ह्यात अनेक राजकीय पक्षात गुंडागिरी करणाऱ्यांची व अवैध धंदे करणाऱ्यांची मोठी फौज असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील काशीकर ज्यांच्यावर उपविभागीय वन अधिकारी यांची बंदूक हिसाकावून त्यांच्यावरच वार करण्याचा प्रयत्न व त्यांना धमकावून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी स्वप्नीलवर गुन्हे दाखल होते व या प्रकरणानंतरच काशीकर ची भाजप मधून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली होती.

याच संधीचा फायदा घेत नवे नवे जिल्हाप्रमुख झालेले संदीप गिऱ्हे यांनी आपला हाथ वाळू व्यवसायात आजमावण्यासाठी स्वप्नील काशीकर ला शिवसेनेत मुंबईत मातोश्रीवर नेऊन प्रवेश करवून घेत महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष पद बहाल करुन गेल्या तीन वर्षात आपले फॉर्चून साधत हायवे वर आला असल्याचे शिवसेनेत सर्वांनी बघितले.

परंतु, स्वतः चे फॉर्चून(नशीब ) आता राजकारणात अतिशय रोचक असून असून पैशाचा गुर्मी त्यांच्या डोक्यात घुसल्याने त्यांची दादागिरी वाढली व पक्ष वाढविण्याऐवजी बँक बॅलन्स वाढविण्याच्या नादात हाल्फ मर्डर करत फिरण्याचे खुले लायसन्सच गिऱ्हे यांनी काशीकर ला दिले कि काय असा प्रश्न पडतो.

या संपूर्ण प्रकरणात महत्वाची बाब म्हणजे मारहाण करण्यात आलेले सरपंच हे शिवसेना (उबाठा) संबंधित असून स्वतः च्या पक्षाच्या सरपंच्यावरच जर हे मारहाण करत असतील तर् इतर जनतेचे हाल काय होणार अशी भीती पक्षांतर्गत कार्यकर्ते व्यक्त करत असून पूर्व विदर्भ संपर्क नेते आ. भास्कर जाधव या प्रकरणावर काय कार्यवाही करतात याकडे कार्यकर्ते लक्ष ठेऊन आहेत.संदर्भात आ. जाधव यांचेशी टीम खबरकट्टा ने टेलिफोनिक संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Pages