मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमके का ठरले पात्र MLAs Disqualification Verdict मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमके का ठरले पात्र; जाणून घ्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयातील महत्त्वाचे 10 मुद्दे - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमके का ठरले पात्र MLAs Disqualification Verdict मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमके का ठरले पात्र; जाणून घ्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयातील महत्त्वाचे 10 मुद्दे

Share This

 खबरकट्टा / मुंबई :MLAs Disqualification Verdict    

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे वाचन केले आहे. शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. तसेच, शिंदे गटाचे १६ आमदारदेखील पात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचा विजय झाला आहे. एकनाथ शिंदे आणि गटाला वैध ठरवताना विधानसभा अध्यक्षांनी दहा महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.MLAs Disqualification Verdict     


नार्वेकरांनी मांडलेले मुद्दे

1. २१ जून २०२१च्या बैठकीचे हजेरीपत्रकाची मूळ प्रत व सादर केलेली प्रत यांमधील तफावत यामुळे हा पुरावा ग्राह्य धरता येणार नाही.


2. बैठकीला अनुपस्थित राहणे हे अपात्रतेचे कारण ठरू शकत नाही. विधीमंडळ अधिवेशनास अनुपस्थिती हे कारण ठरू शकते.


3. संपर्काच्या बाहेर गेले, केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. शिवाय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हेही सिद्ध झाले.


4. सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेंचा हे सिद्ध झाल्याने२१ जून २०२२ च्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्दयावर अपात्रता ठरविता येणार नाही.


5. बैठक घेतेवेळी सुनिल प्रभू हे प्रतोद नव्हते. त्यामुळे त्यांनी बजावलेला व्हिप ग्राह्य धरता येणार नाही.


6. मिलिंद नार्वेकर आणि फाटक एकनाथ शिंदेंना सुरतला भेटले त्यामुळे आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही हे मान्य करता येणार नाही. भरत गोगावले यांनी सांगितले की सगळे आमदार उपस्थित होते. ३ आमदारांनी ही साक्ष दिली आहे की नार्वेकर आणि फाटक शिंदेंना भेटले.


7. विधिमंडळ बहुमत ज्याचे असेल त्याचाच पक्ष असतो. त्यामुळे शिंदे गट हीच खरी शिवसेना असून एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र आहेत.


8. भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य आहे. भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड वैध आहे. २१ जून २०२२ रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते.


9. एकनाश शिंदेंना हटवण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना नाही. पक्षप्रमुखाला पक्षातून कोणालाही काढता येत नाही. एकाचा निर्णय लोकशाहीसाठी धोक्याचं आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेले निर्णय ग्राह्य धरले जातील.


10. शिवसेनेची मूळ घटना मान्य, बाकीच्या घटनादुरुस्त्या मान्य नाहीत.

Pages