गुरुबक्षानी कंपनीच्या कामाची चौकशी करण्यास टाळाटाळ; पिडब्ल्यूडीच्या अधीक्षक अभियंत्याच्या आदेशाला केराची टोपली #NRH - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



गुरुबक्षानी कंपनीच्या कामाची चौकशी करण्यास टाळाटाळ; पिडब्ल्यूडीच्या अधीक्षक अभियंत्याच्या आदेशाला केराची टोपली #NRH

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

शेकडो कोटींचे कंत्राट घेऊन निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे बांधकाम करणारी गुरुबक्सानी कंपनीच्या चौकशीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. गाडेगोने यांनी दिले. 1 डिसेंबरला हा आदेश दिला असून राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता मिश्रा याबाबत तपासणी आणि कारवाई करून तक्रारदारास त्याची माहिती देणे आवश्यक होते. मात्र मिश्रा यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली असून ते याची चौकशी करण्यास सातत्याने टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाची या वादग्रस्त कंपनीशी कशी हातमिळवणी केली आहे याची प्रचिती येत आहे. चौकशी केल्यास या कंपनीच्या कोट्यवधी रुपयांचे घबाड समोर येण्याची शक्यता असल्याने ही टाळाटाळ करण्यात येत असल्याचे बोलल्या जात आहे.






डी. सी. गुरुबक्षानी या कंपनीला चंद्रपुर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग 930, सिंदेवाही-नागभीड, सिंदेवाही-मूल महामार्ग आणि गोंडपीपरी ते विठ्ठलवाडा या मार्गाचे कंत्राट मिळाले. मात्र, या कंपनीने या कामात मोठा भ्रष्टाचार केला. नियमांना धाब्यावर बसवत असिमीत गौण खनिजाचे उत्खनन केले, यात शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवला तसेच निकृष्ट दर्जाचे साहित्य यात वापरले. बांधकाम करत असताना राष्ट्रीय महामार्गचे नियम आहेत त्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले. त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. गाडेगोने यांनी 1 डिसेंबर 2023 ला सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2 चे कार्यकारी अभियंता यांना पत्र लिहून सदर कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यात तक्रारदार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गाचे (विभाग पोटेगाव, गडचिरोली) कार्यकारी अभियंता मिश्रा यांनी चौकशी आणि कारवाई करून त्याची माहिती तक्रारदार यांस द्यायची होती, मात्र 20 दिवस लोटूनही यावर अद्याप कुठलीही चौकशी करण्यात आलेली नाही.

कार्यकारी अभियंता मिश्रा यांची टाळाटाळ

याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता मिश्रा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आपण सध्या सुट्टीवर आहो, यावर काहीही बोलता येणार नाही असे म्हणून त्यांनी वेळ मारून नेली. त्यामुळे या कामात नक्कीच काही गौडबंगाल आहे याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सुपरवायझर निंबाळकरचे नशीब पालटले

ह्या रस्त्याचे काम मिळाले आणि सुपरवायझर अरूण निंबाळकर यांचे नशीब पालटले. आधी कंपनीत एक साधे मजूर म्हणून ते कार्यरत होते. आपल्या चाणाक्ष स्वभावामुळे त्यांना दिवाणजीपद मिळाले. लोकांना मॅनेज करण्यात तरबेज असल्याने लवकरच ते सुपरवायझर झाले. त्यातही त्यांनी आपली चुणूक दाखवली. कामाबाबत तक्रारी आल्या की त्या कशा मॅनेज करायच्या याचे कौशल्य निंबाळकर यांनी हशील केले. आणि याच कंपनीच्या भरवशावर बघता बघता निंबाळकर यांनी आपले वेगळे साम्राज्य निर्माण केले. आज निंबाळकर मोठमोठ्या महागड्या गाड्यात निंबाळकर फिरत आहेत. निंबाळकर म्हणजेच कंपनीचे मालक असे लोक समजायला लागले आहेत.

तक्रारदार एका मोठ्या राजकीय नेत्यासोबत आणि प्रचलित समाज सेवकांसोबत आर्थिक व्यवहार करतांनाचा अरुण निंबाळकर यांचा संभाषण लवकरच प्रसारित करण्यात येईल. आता पर्यंत अनेक तक्रारी झाल्या  परंतु एकाही तक्रारीवर एकही चौकशी किव्हा कार्यवाही झालेली नाही. सर्व सेटिंग करून मार्गी लावण्यात आले. तसेच सेटिंग संबंधित काही ऑडिओ संभाषण खबरकट्टा च्या हाती लागलेले आहे ते लवकरच पुढील बातमीत प्रकाशित करण्यात येईल.

कार्यकारी अभियंता आणि संबंधित कंत्राटदार यांची मिलिभगत असून वरिष्टांचा आदेश असून सुद्धा चौकशी होत नाही. 15 दिवसात कार्यवाही झाली नाही तर मुंबई उच्च न्यायालय च्या नागपूर खंडपिठात तक्रारदार याचिका दाखल करणार असून संपूर्ण सत्य जनते पुढे आणून डी. सी. गुरुबंक्षांनी कंपनीवर कार्यावाही झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.

डी. सी गुरुबंक्षांनी कंपनीच्या एका राजकुमार नावाच्या वर्कर कडून टीम खबरकट्टा ला कॉल आलेला होता. आम्हचे फोटो नाही आहेत आम्हचा काम चांगला आहे आम्हचे मालक तुमच्याशी बोलतील बातमी घेऊ नका अशी त्यांनी विनंती केली. परंतु राजकुमार यांना आमच्या बातमीवर तुम्हची प्रतिक्रिया द्या म्हटल्यावर त्यांनी नकार दिला.

टीम खबरकट्टा पुराव्याणीशी बातम्या देण्यात विश्वास ठेवते.कुणाच्याही सांगण्यावरून मालिका थांबत नाही लवकरच भाग 3 मध्ये बाकी मुद्दे प्रसारित करण्यात येईल.

Pages