छतावर वाघ – खाली भाविक; ताडोबातील निमढेला गावातील थरारक प्रकार#chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



छतावर वाघ – खाली भाविक; ताडोबातील निमढेला गावातील थरारक प्रकार#chandrapur

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर :

चंद्रपूर : वाघ बघण्यासाठी नशीब लागतो मात्र वाघ दिसला की माणूस घाबरून जातो. पण चंद्रपूर जिह्यात असा एक प्रकार घडला कि तुम्ही पण ऐकून थक्क व्हाल. ताडोबा अभारण्यात निम ढेका गावात मंदिराच्या छतावर वाघ आणि खाली भाविक असा प्रसंग व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला.

चंद्रपूर जिल्यातील चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर भागात निमढेला गावातील हा थरारक व्हीडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. निमढेला येथील विठ्ठल रुखमाय मंदिरात भाविकांची गर्दी व मंदिराच्या छतावर वाघ अशे दृश्य व्हिडीओ मध्ये दिसत आहे.

मंदिराच्या छतावर वाघ चालत होता मंदिराच छत हे टीनाच असल्यामुळे भाविकांच्या निदर्शनात वाघ दिसून आला तेथील अनेकांच्या काळजात थरकाप उडाला. एवढाच नव्हे तर वाघ छतावर बराच वेळ थांबला होता. काही वेळातच छोटा मटका वाघ जंगलात दिसेनासा झाला वाघ तिथून निघे पर्यंत भाविकांनी आपला श्वास रोखून ठेवला होता.

चिमूर तालुक्यातील निमढेला बफर क्षेत्रात रामदेगी येथे विठ्ठल रखुमाय मंदिर आहे. या मंदिरात रोज भाविक भक्त येतात पूजा अर्चना करतात. पण त्यांना आज एक वेगळाच प्रकार बघायला मिळाला. कधी स्वप्नात पण असा प्रसंग ओढवेल अस त्यांना वाटल नाही. या ठिकाणी भाविकांची नेहमीच गर्दी असते मात्र वाघ मानव संघर्षाना बघाल मिळालेला.

Pages