चंद्रपूरच्या सार्वजनिक गणेश मंडळाला राज्य सरकारचा पुरस्कार#chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूरच्या सार्वजनिक गणेश मंडळाला राज्य सरकारचा पुरस्कार#chandrapur

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :

चंद्रपूर येथील सिव्हिल लाइन, पटवारी ऑफिसजवळ असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळाला राज्य शासनाने आयोजित केलेल्या २०२३ गणेशोत्सव स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.या मंडळाने किल्ले रायगडचा देखावा सादर केला होता. विशेष म्हणजे, रक्तदानासह विविध सामाजिक उपक्रमही या मंडळाने गणेशोत्सवादरम्यान राबविले होते.

राज्य सरकारने यावर्षी पार पाडलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्कृष्ट मंडळांना गुरुवारी पुरस्कार जाहीर केले. या पुरस्काराचे सांस्कृतिक तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मुंबईत वितरण करण्यात आले. यावेळी चंद्रपूर येथील सार्वजनिक गणेश मंडळाला जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला. या पुरस्कारामध्ये २५ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष उमेश दा. मुदलीयार आणि सदस्य यावेळी उपस्थित होते.

Pages