राजकीय : वडेट्टीवार आले... पटोले जाणार...???#vijaywadettiwar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राजकीय : वडेट्टीवार आले... पटोले जाणार...???#vijaywadettiwar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजकीय :

प्रादेशिक समोतल आणि जातीय समीकरण साधण्याची काँग्रेसची परंपरा लक्षात घेता विजय वडेट्टीवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड तशी धक्कादायक नाही. परंतु, वडेट्टीवारांची ही 'पदोन्नती' काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी मात्र धोक्याचा इशारा मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीने राज्यातील राजकीय घडामोडीने वेग घेतला आहे. काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद आले आणि त्यासाठी विजय वडेट्टीवार यांना संधी मिळाली. पण, राज्यातील जातीय राजकारण बघता वडेट्टीवार यांना एवढ्या सहज हे पद मिळालेले नाही.आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात वाव आहे. त्यावर नजर ठेवून काँग्रेसने ही निवड केल्याचे कळते.
उत्तर महाराष्ट्रातीलनेते बाळासाहेब थोरात हे विधानसभेतील गटनेते आहेत.विधान परिषदेत पश्चिम महाराष्ट्रातील सतेज पाटील यांना.संधी मिळालसंधी मिळाली आहे. प्रदेशाध्यक्षपद नाना पटोले यांच्या रूपाने विदर्भाला देण्यात आले आहे.

तर मराठवाड्याकडे सध्यातरी पक्ष संघटनेत किंवा विधानसभेत एकही मोठे पद नाही. विदर्भाला मात्र प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. नेमकी हीच बाब पटोले यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यांचे पक्षातीलच विरोधक सांगत आहेत.

पटोले यांच्या कार्यशैलीवर पक्षातील जुने नेते नाराज असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांनी तर दिल्लीत जाऊन पटोले यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. पटोले यांनी उघडपणे वडेट्टीवार यांच्यावर टीका केली होती. हा अलिकडचा अनुभव ताजा असतानाही वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याने पटोलेंच्या भविष्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला पक्ष संघटनेते प्रादेशिक समतोल साधावा लागणार आहे. तसेच जातीय समीकरण देखील बघावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेता मराठवाड्याकडे प्रदेशाध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पटोले आणि वडेट्टीवार हे दोन्ही नेते विदर्भातील आहेत. तसेच दोन्ही नेते ओबीसी आहेत.

सध्या ओबीसींचे राजकारण जोरात आहे. त्यामुळे एकतरी आणि वाडेट्टीवारांसारखा आक्रमक ओबीसी नेता महत्वाच्या पदावर ठेवणे आवश्यक होते. तसेच घडले आहे. परंतु, आता प्रदेशाध्यक्ष पद मराठवाड्याकडे जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

Pages