खबरकट्टा /चंद्रपूर :राजुरा 2 ऑगस्ट
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे शिवाजी हायस्कुल चुनाळा येथील विध्यार्थीना नोटबुक पेन, वितरण व शालेय परिसरात वृक्षारोपण तसेंच या शाळेत शालेय पोषण आहाराचे अन्न शिजविणाऱ्या महिलेला साळीचोळी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानिक शिवाजी हायस्कुल चुनाळा शाळेचे मुख्याध्यापक नानाजी डाखरे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून चुनाळा ग्रामपंचायत चे सरपंच बाळनाथ वडस्कर, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराज राज्य अध्यक्ष बादल बेले, नेफडो च्या राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतीक विकास समिती च्या नागपूर विभाग अध्यक्षा रजनी शर्मा, सर्वांनंद वाघमारे, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बबलू चव्हाण, जयश्री देशपांडे, कृतिका सोनटक्के, रफत शेख, कविता शर्मा, अश्लेषा चिडे, दीपक धोपटे, हरिश्चंद्र वीरूटकर , नरेंद्र देशकर, करुणा लोखंडे आदींची उपस्थिती होती.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने शिवाजी हायस्कुल चुनाळा येथील विध्यार्थीना नोटबुक, पेन वितरित करण्यात आले. व फूल फळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना चुनाळा ग्रा. पं. चे सरपंच बाळनाथ वडस्कर म्हणाले सेवावृत्तीने समाजात बदल घडतो याकरिता आपणही समाजाचे काही देण लागतो तसेच आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य केले पाहिजेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मि नगराळे, श्रीशा निमकर या विध्यार्थीनी केले. प्रास्ताविक सर्वांनंद वाघमारे यांनी तर आभार तन्वी दुर्गा या विध्यार्थीनीने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे सदस्य तसेच शिवाजी हायस्कुल चुनाळा येथील शिक्षक जया पद्मशाली, गजानन दासरवार, राजू चिडे, मासिरकर शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.