खबरकट्टा /चंद्रपूर :राजुरा
राजुरा 9 ऑगस्ट
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे राजकुमार हिवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त चंद्रपूर जिल्हा भारत स्काऊट्स व ना चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा जिल्हा आयुक्त गाईड, चंद्रपूर जिल्हा भारत स्काऊट्स, गाईड्स यांच्या मार्गदर्शनखाली स्काऊट्स -गाईड्स उद्बोधन वर्ग नुकताच संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भास्करराव येसेकर हे उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून मनोज गौरकार, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती राजुरा हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून हेडाऊ साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती राजुरा, चंद्रकांत भगत,जिल्हा संघटक स्काऊट्स, चंद्रपूर जिल्हा भारत स्काऊट गाईड कार्यालय, यशवंत हजारे, माजी जिल्हा संघटक स्काऊटस, पी.एम. जाधव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ते, तज्ञ मार्गदर्शक म्हणून किशोर उईके, प्रशांत खुसपुरे, अतिथी म्हणून आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊटस मास्तर बादल बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वप्रथम लॉर्ड बेडन पॉवेल, लेडी बेडन पॉवेल व शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर राजगोंड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांना पुस्तकं भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनिय मनोगतातून मनोज गौरकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती करिता स्काऊट गाईड चळवळील.
तर प्रमुख अतिथी म्हणून हेडाऊ साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती राजुरा, चंद्रकांत भगत,जिल्हा संघटक स्काऊट्स, चंद्रपूर जिल्हा भारत स्काऊट गाईड कार्यालय, यशवंत हजारे, माजी जिल्हा संघटक स्काऊटस, पी.एम. जाधव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ते, तज्ञ मार्गदर्शक म्हणून किशोर उईके, प्रशांत खुसपुरे, अतिथी म्हणून आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊटस मास्तर बादल बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वप्रथम लॉर्ड बेडन पॉवेल, लेडी बेडन पॉवेल व शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर राजगोंड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांना पुस्तकं भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनिय मनोगतातून मनोज गौरकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती करिता स्काऊट गाईड चळवळीला प्राधान्य देऊन ही चळवळ सक्रियपणे राबवण्याची व वेगवेगळ्या समुदाय विकास उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी पी. एम. जाधव यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
या उद्बोधन वर्गात स्काऊट्स गाईडस विध्यार्थीची ऑनलाईन व ऑफलाईन युनिट नोंदणी करणे , युनिट दप्तर तयार करणे , प्रशिक्षण टप्पे, राज्य, राष्ट्रपती पुरस्कार, पंतप्रधान ढाल स्पर्धा, समुदाय विकास प्रकल्प, सेवा प्रकल्प, प्रथमोपचार व दोरीच्या गाठींचे प्रात्यक्षिके आदिविषयी माहिती देण्यात आली. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात मुल, नागभीड, वरोरा येथे उद्बोधन वर्ग घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाईड्स कॅप्टन रोशनी कांबळे यांनी केले. तर प्रास्ताविक तज्ञ मार्गदर्शक किशोर उईके यांनी व आभार प्रदर्शन स्काऊट मास्तर रुपेश चिडे यांनी केले. या उद्बोधन वर्गाकरिता राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यातील स्काऊट मास्तर व गाईड कॅप्टन मोठया संख्येने उपस्थित होते.