ओबीसी विद्यार्थी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रदिनापूर्वी सुरु करा*--प्रा.अनिल डहाके#chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ओबीसी विद्यार्थी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रदिनापूर्वी सुरु करा*--प्रा.अनिल डहाके#chandrapur

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :

महाराष्ट्र सरकारने 72ओबीसी विद्यार्थी वसतिगृह सुरु का रण्या संदर्भात शासन निर्णय काढला.पावसाळी अधिवेशनात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी 15आगस्ट 2023पूर्वी 72ओबीसी वसतिगृह सुरु करण्यासंदर्भात सभागृहात घोषणा केली. परंतु वसतिगृह सुरु करण्यासंदर्भात शासन, प्रशासनाच्या हालचालींना वेग आला नाही.नवीन सत्र सुरु झाले अनेक विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह सुरु होईल या आशेने जिल्ह्याच्या ठिकाणी विविध शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला आहे.एस. सी.,एस.टी. विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु आहे परंतु ओबीसी वसतीगृह प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होतील म्हणून विदयार्थी वाट बघत आहे.72ओबीसी वसतिगृह त्वरित सुरु करण्यात यावे अन्यथा सामूहिक आत्मदहन करू असा इशारा ओबीसी सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,अवर सचिव,महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मुंबई यांना दिला.


त्याची दखल घेऊन अवर सचिव महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मुंबई यांनी आत्मदहन करू नये 72ओबीसी वसतिगृह सुरुकरण्याची प्रक्रिया सुरु आहे असे पत्राद्वारे प्रा. अनिल डहाके यांना कळविले,दि. 08/08/2023ला सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण चंद्रपूर यांनी प्रा. अनिल डहाके,जिल्हाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ, चंद्रपूर यांना बैठकीसाठी आमंत्रित केले.यामध्ये ओबीसी विद्यार्थी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया15आगस्ट पूर्वी सुरु करण्यात यावी अन्यथा ओबीसी सेवा संघ,चंद्रपूर द्वारा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.

या मध्ये सकारात्म चर्चा झाली शासन स्तरावरून याची प्रक्रिया सुरु आहे.वसतिगृहासाठी दोन इमारतीचे प्रस्ताव पाठवले आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी दिली.यावेळी ओबीसी सेवा संघ जिल्हाध्यक्ष,प्रा. अनिल डहाके, महासचिव ऍड. विलास माथनकर, शहरध्यक्ष, खुशाल काळे,राहुल भोयर बैठकीला उपस्थित होते.

Pages