खबरकट्टा / चंद्रपूर :घुग्घुस
चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ, बल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य स्वर्गीय वसंतराव दोंतुलवार यांची 78 वी जयंती महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयात नव प्रवप्रवेशीत विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ व ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. रवी धारपवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. महेंद्र कुंभारे व प्रा. संतोष गोहोकार हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संयोजन डॉ. माधव कांडणगिरे व मंगेश जमदाडे यांनी केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. माधव कांडणगिरे यांनी वसंतरावजी दोंतुलवार यांचा जीवन परिचय करून देत त्यांच्या कार्याचा गौरव करून कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी प्रा. गणेश सुरजूसे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत वाचनाचे महत्त्व पटवून सांगत समयोचीत मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. धारपवार यांनी वसंतरावजी दोंतुलवार यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत ग्रंथांचे वाचन व महत्त्व पटवून देत महाविद्यालयात नव प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व अभिनंदन केल यावेळी मान्यवरांच्या हस्ते नव प्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत केले गेले सदर कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.