खबरकट्टा/चंद्रपूर:
चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या ब्रम्ह नगरीत नव्यानेच स्थापन झालेल्या एका इंटरनॅशनल शाळेत शिक्षक असणाऱ्या 25 वर्षीय आवेझ शेख ह्या शिक्षकाने 13 वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून रात्रीच्या वेळी वाईट हेतूने तिच्या घरात प्रवेश केल्याने त्या शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की शहरात नव्यानेच सुरू झालेल्या नामवंत शाळेत इंग्रजी विषय शिकविण्यासाठी अवेझ शेख ह्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान ह्या शिक्षकाची शाळेतील एका 13 वर्षीय विद्यार्थिनीवर वाईट नजर पडली. त्याने तिचा मोबाईल क्रमांक मिळवुन तिला वेळी अवेळी संदेश पाठवुन आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता. हा शिक्षक त्या मुलीचा वारंवार पाठलाग करत असल्याचे पालकांचे म्हणणे असुन 19 जुलै रोजी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास आरोपी शिक्षक पिडीत विद्यार्थिनीच्या घरात शिरला असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले त्यामुळे अझ शेख ह्याने तिथून पोबारा केला.#khabarkatta chandrapur
अखेरीस 20 जुलैच्या सकाळी पिडीत मुलीसह तिच्या आईने ब्रम्हपुरी पोलीस ठाणे गाठून संबंधित शिक्षक अवेझ शेख विरुद्ध तक्रार दाखल केली असुन पोलिसांनी 354 (ड), 452 व बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्याच्या कलम 12 (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पी एस आय स्वाती फुलेकर करत आहेत.#khabarkatta chandrapur
प्राप्त माहितीनुसार सदर इंटरनॅशनल शाळा वजनदार राजकीय नेत्यांशी संबंधित असुन शाळा व्यवस्थापनाने ह्या प्रकरणातून आपले अंग काढून घेण्याची भुमिका स्वीकारल्याचे दिसुन येत आहे. ह्या घटनेसंदर्भात शाळेचे मुख्याध्यापक प्रविण ढोले ह्यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आरोपी शिक्षकाला दीड महिन्यांपूर्वीच बडतर्फ केले असल्याचे सांगितले आहे.