खबरकट्टा/चंद्रपूर:
मूल :- फडशा पाडायला आलेल्या वाघाला तीन म्हशींनी झुंज देत जखमी केल्याचा थरार मूल तालुक्यातील बेंबाळ शिवारात गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडला. म्हशींनी एकीच्या बळावर जंगलाच्या राजाला दिलेली थरारक झुंज परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. जखमी वाघाची सहा तासातच मृत्यूशी झुंज संपली.#khabarkatta
वाघ जखमी झाल्याची वार्ता परिसरात पसरताच लोकांची तोबा गर्दी झाली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वन विभागाचे पथक दाखल झाले. वनविभागाने जखमी वाघावर उपचार करण्यापूर्वीच सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.#khabarkatta chandrapur
मूल तालुक्यातील येसगाव येथील गणेश भाऊजी सोनुले (35) हा गुराखी मनोरुग्ण असल्याने रात्री-बेरात्री फिरत असतो. गुरुवारी पहाटे 4 वाजता तो हातात कुन्हाड घेऊन घराबाहेर पडला. भजाळी गावाजवळ वाघाने गणेशवर हल्ला केला. गणेशने तत्परता दाखवत हातातील कुन्हाड उगारताच वाघाने पोबारा केला. वाघाच्या हल्ल्यात गणेश जखमी झाला. दरम्यान, हाच वाघ फिरत बेंबाळ शेतशिवारात आला.#khabarkatta
जवळच म्हशींचा कळप चरत होता. वाघाने एका म्हशीवर हल्ला करताच कळपातील तीन म्हशी त्याच्यावर तुटून पडल्या. म्हशींच्या एकजुटीमुळे वाघाचा टिकाव लागला नाही. हार पत्करत वाघ जखमी अवस्थेत एका बाजूला निपचित पडला.