दुहेरी हत्याकांड; मित्रांनीच केली दोन सख्ख्या भावांची हत्या...#Double Homicide; Two brothers were killed by friends - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



दुहेरी हत्याकांड; मित्रांनीच केली दोन सख्ख्या भावांची हत्या...#Double Homicide; Two brothers were killed by friends

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

यवतमाळ : ‘मर्डर सिटी’ अशी नवी ओळख मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सातत्याने सुरू आहे. यवतमाळ शहरात दोन घटना घडल्यानंतर पुसद शहर बुधवारी मध्यरात्री दुहेरी हत्याकांडाने हादरले. सोबत राहणाऱ्या मित्रांनीच दोन सख्ख्या भावांवर हल्ला करून त्यांना ठार केले. या हल्ल्यात तिसरा भाऊ गंभीर जखमी आहे.#khabarkatta chandrapur

राहुल हरिदास केवटे, विलास हरिदास केवटे अशी मृतांची नावे आहेत, तर बंटी हरिदास केवटे हा गंभीर जखमी आहे. ही घटना बुधवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास पुसद शहरातील इटावा वॉर्ड भागात घडली. आरोपी पवन वाळके, निलेश थोरात, गणेश तोडकर, गणेश कापसे, गोपाल कापसे, अवि चव्हाण यांच्यासोबत केवटे बंधूंचा वाद झाला होता. यातूनच पवन वाळके याने मित्रांना सोबत घेऊन रात्री केवटे बंधू झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला केला. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.#khabarkatta chandrapur

गंभीर जखमीला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. पुसद पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सततच्या खुणांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

Pages