खबरकट्टा/चंद्रपूर:
भारत दूरसंचार निगम लिमिटेड मार्फत पुरविण्यात येत असल्येल्या फायबर नेटवर्क सर्व्हिस पुरविण्यात येणाऱ्या सेवा पुरवठा धारकाकडून नेटवर्क सर्व्हिस देण्यास टाळाटाळ होत असल्याचे आलापल्लली परिसरात दिसून येत आहे. तसेच ह्या संदर्भात वरिष्ट कार्यालयाशी तसेच स्थानिक प्रतिनीधीशी संपर्क करतांना कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. स्थानिक प्रतिनीधी उडवा उडवीची उत्तरे देत दहा वेळा येजा करून सेवा पुरविणे शक्य नाही व मला एकच काम नसल्याचे सांगून बतावणी केली जात आहे. पुरवठा धारकाकडून सेवा पुरविण्यास जर त्रास होत असेल तर फायबर नेटवर्कचे कनेक्शन काढून टाका अशी थेट धमकीच देत ग्राहकांची दमदाटी केली जात आहे. आपल्या समस्या मांडल्यावर स्थानिक प्रतिनीधी कडून ह्याप्रकारची धमकी ग्राहकांना मिळत असल्यास ऑनलाइन माध्यमातून नियमित करण्यात येणारे कामे कसे करायचे ? असा प्रश्न स्थानिक जनतेसह , ग्राहकांना पडला आहे. ग्रामस्थांना सुद्धा अश्या गैरसेवेचा त्रास सहन करावा लागत आहे.#khabarkatta chandrapur
ह्या संदर्भात ग्राहकांनी स्थानिक प्रतिनीधीशी संपर्क करून आपल्या अडचणी व्यक्त केल्या असता मीच ह्या आलापल्ली परिसराचा बॉस असून माझ्या मनाला वाटेल तेव्हा काम करेल माझ्या संदर्भात आपण वरिष्ट कार्यालयाला तक्रार केली असल्याने मी माझ्या इच्छेने 72 तासानंतर सेवा देईन असे बोलून ग्राहकांची पिळवणूक होताना दिसत आहे. ह्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. परिसरात योग्य प्रमाणे प्रतिनीधीकडून ग्राहकांना सेवा पुरवठा होत नसेल तर आपल्या सेवेचा काय उपयोग , नियमितपणे बिल भरल्यानंतर सुद्धा सुरळीत सेवा मिळत नाही शासनाने सगळी कामे ऑनलाइन पद्धतीने केली असून ह्या सगळ्या ऑनलाइन कामांचा खोळंबा झाल्याशिवाय राहणार नाही. ह्याप्रमाणेच सेवा मिळत असल्यास ऑनलाइन कामे करणाऱ्या विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्त तसेच पीक विमा संदर्भात काम करणारे शेतकरी बांधवांचे नुकसान होत आहे.#khabarkatta
अशी तक्रार आलापल्ली वासियांनी वरिष्ट कार्यालयाला केली असून लवकरात लवकर आम्हाला योग्य सेवा पुरविण्यात यावी तसेच आमच्या तक्रारीची दखल घेऊन आपल्याकडून नेमणूक करण्यात आलेल्या प्रतिनिधीवर योग्यती कार्यवाही करावी व सुरळीत सेवा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
ह्या गंभीर समस्येवर वरिष्ट कार्यालय कोणत्या उपाययोजना करतात ह्याकडे परिसरातील ग्राहकांचे लक्ष लागलेले दिसून येत आहे.