अपात्र सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची पुनर्स्थापना करावी-विदर्भ अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद अ‍ॅड. देवा पाचभाई - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अपात्र सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची पुनर्स्थापना करावी-विदर्भ अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद अ‍ॅड. देवा पाचभाई

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने.ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागावर विजयी झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने. राज्यपालाच्या संमतीने पुन्हा वर्षभराची मुदतवाढ देण्याचा आदेश जारी केल्याने अपात्र ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांची पूनस्थापना करण्याचे आदेश काढावेत अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली आहे. सरपंच परिषदेचे प्रदेशअध्यक्ष जयंतदादा पाटील प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे. राज्य सल्लागार राजेंद्र कराळे. अ‍ॅड देवा पाचभाई विदर्भ अध्यक्ष यांनी पाठपुरावा केला.मंत्रीमंडळाच्या 28 जूनच्या झालेल्या बैठकीत विषय क्रमांक 26नुसार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी.#khabarkatta chandrapur 

जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यपालाच्या सहीने व शासनाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास वर्षभर मुदतवाढ देण्याचा आदेश 10 जुलैला जारी केला आहे.त्यामुळे सर्व अपात्र सरपंच उपसरपंच व सदस्य यांना दिलासा देऊन त्यांना पूनस्थापना करण्याची कार्यवाही तात्काळ करावी.अश्या मागणीचे पत्र जळगाव जिल्हाअधिकारी यांना देण्यात आले.

Pages