लहान भावानेच केली मोठ्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या...#The younger brother killed the elder brother with an ax - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



लहान भावानेच केली मोठ्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या...#The younger brother killed the elder brother with an ax

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

वर्धा : घरगुती कारणातून झालेल्या वादात संतापलेल्या धाकट्या भावाने चक्क निद्रावस्थेत असलेल्या मोठ्या भावाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. ही धक्कादायक घटना हिंगणी नजीकच्या देवनगर परिसरात 29एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी सेलू पोलिसांनी आरोपी भावाला अटक केल्याची माहिती दिली. रवींद्र बंडू तराळे (32) असे मृतकाचे नाव आहे तर अमोल बंडू तराळे (28) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, हिंगणीनजीकच्या देवनगर येथील वॉर्ड ३ मध्ये दोन्ही भावंडे आई- वडिलांसोबत राहत होती. दोन्ही भावांत मागील काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. 29 रोजी दुपारच्या सुमारास मोठा भाऊ रवींद्र घरात झोपून असताना लहान भाऊ अमोल याने रागाच्या भरात कुऱ्हाडीने रवींद्रच्या मानेवर तसेच चेहऱ्यावर जबर घाव घालून निर्घृण हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सेलू पोलिसांनी धाव घेत पंचनामा करीत आरोपी भावाला अटक केली. पुढील तपास पोलिस करीत असल्याची माहिती आहे.


Pages