कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूकित शेतकरी सहकारी विकास आघाडी चे एक हाती वर्चस्व - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूकित शेतकरी सहकारी विकास आघाडी चे एक हाती वर्चस्व

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर ची निवडणूक दि 28 एप्रिल ला होऊन दि 29 एप्रिल ला होऊन आमदार बंटीभाऊ भांगडिया व संजय डोंगरे यांच्या शेतकरी सहकारी विकास आघाडी पॅनल चे 16 उमेदवार मताधिक्काने व 1 उमेदवार अविरोध निवडून 17 उमेदवार विजयी झाले असल्याने एक हाती सत्ता शेतकरी सहकारी विकास आघाडी ची सत्ता आली .

शेतकरी सहकारी विकास आघाडी च्या विजयी उमेदवारात सेवा सहकारी संस्था गटातून प्रकाश पोहणकर (306 मते ), घनश्याम डुकरे (314), नंदू गावंडे (342), दशरथ ननावरे (342) ,कैलास धनोरे (322), रवींद्र पंधरे (306), प्रशांत गुरपुडे334), महिला गटातून रेखाताई मालोदे (354) , गीता कारमेंगे (381),विमुक्त भटक्या गटातून प्रशांत चिडे (329), ग्राम पंचायत गटातून मंगेश धाडसे (416), संदीप पिसे (393),दिनकर शिनगारे (350), भास्कर सावसाकडे (396),अडते व व्यापारी गटातून मनोहर पिसे (69), अनिल वनमाळी(66),सेवा सहकारी मागासवर्गीय गटातून अविरोध राजू बानकर विजयी झाले 

विजयी उमेदवार यांची विजयी मिरवणूक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय पासून ढोल ताशा च्या वाद्य गजरात घोषणा देत श्रीहरी बालाजी मंदिरात देऊन श्री चे दर्शन घेऊन समारोप भांगडिया जुना वाडा येथे आमदार बंटीभाऊ भांगडिया , सहकार नेते संजय डोंगरे यांचे मार्गदर्शन झाल्यावर समारोप करण्यात आले.

या मिरवणूक मध्ये भाजप, भाजयूमो, महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.


Pages