नगरसेविकेच्या भावाचे अतिक्रमण वाचविण्यासाठी सत्ता व विरोधातील नगरसेवक एकत्र...#The corporators of power and opposition together to save the encroachment of the corporator's brother - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



नगरसेविकेच्या भावाचे अतिक्रमण वाचविण्यासाठी सत्ता व विरोधातील नगरसेवक एकत्र...#The corporators of power and opposition together to save the encroachment of the corporator's brother

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

ब्रह्मपुरी शहराच्या मध्यभागी असलेल्या विद्यानगर येथील तलाठी कार्यालयाजवळ गट नं. 605 वरील शासकीय मालकीच्या जागेवर नगरसेविका श्रीमती नीलिमा लक्ष्मण सावरकर यांचे सख्खे भाऊ दिनेश प्रभाकर बोंबटकर यांनी अतिक्रमण केले आहे. सदर अतिक्रमीत जागेचा वापर अक्षद बार अँड रेस्टॉरंट च्या पार्किंग करिता वापरली जात आहे मात्र, या अतिक्रमण विरुद्ध महसूल प्रशासन व न.प. प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही.

गट न.605 0.6 हे.आर. पैकी 0.3 हे.आर.जागा ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघाने पत्रकार भवनासाठी 20 वर्षाकरिता भाडेतत्वाने शासनाकडे मागणी केली त्या अनुषंगाने तहसीलदार ब्रह्मपुरी यांनी नगरपरिषदकडे नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. मागील आठवडापूर्वी न.प.ची सभा झाली त्यात एका नगरसेवकाने सदर गट नं. ची जागा अन्य कारणासाठी राखीव ठेवण्यात आली असल्याचे कारण पुढे करीत नाहरकत प्रमाणपत्र देण्यास विरोध केल्याचे कळते, मात्र, ब्रह्मपुरी न.प. च्या सत्तेतील व विरोधातील नगरसेवकांना सदर जागेवर विद्यमान नगरसेविकेच्या मुलाच्या अक्षद बार अँड रेस्टॉरंट ची पार्किंग करून अतिक्रमण केल्याचे दिसून येत नाही का? की नगरसेविकेच्या भावाने केलेले अतिक्रमण वाचविण्यासाठी नाहरकत नाकारण्यात आले का? असा प्रश्न निर्माण होत आहे.#khabarkatta chandrapur 


Pages