सांस्कृतिक राजधानी, अशी पुण्याची ओळख आहे. पण, हीच पुसण्याचे काम गेल्या काही काळापासून सुरू असल्याचे दिसते. पुढे येणाऱ्या विवीध घटनांमुळे पुण्याच्या लौकिकाला डाग लागत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतेच पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल सव्वा दोन कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणले जात होते. याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळक्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वा दोन कोटी रुपये किंमतीचा एक किलो 108 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन जप्त करून दोघांना अटक केली आहे.#khabarkatta chandrapur
आझाद शेरजमान खान वयवर्ष 35 व नागेश्वर राजाराम प्रजापती वयवर्ष 35, दोघेही रा. पिपलखेडी, अलोट, रतलाम, मध्यप्रदेश अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. एका लहान मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी मनोजकुमार साळुंखे, मारूती पारधी, हे दोघेजण गस्त घालत होते. त्यावेळी मध्य प्रदेशातील काही व्यक्ती पुण्यात अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खराडी येथे सापळा रचून संबंधित वाहनाची तपासणी करण्यास सुरूवात केली. एक दुचाकी खराडीकडून पुण्याच्या दिशेने निघाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्यांना तात्काळ थांबविले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यावेळी त्यांच्याकडे 2 कोटी 21 लाख 60 हजार रूपये किंमतीचे व 1 किलो 108 ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन, 31 हजार रुपयांचे 4 मोबाईल, रोख रक्कम असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.#khabarkatta chandrapur

