खबरकट्टा/चंद्रपूर:
महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनानिमित्त कोरपणा व जिवती तालुक्यात पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत कार्यान्वित झालेले हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते पार पडले.#khabarkatta chandrapur
कोरपणा इथे सदर कार्यक्रमाला नगरपंचायत कोरपण्याच्या नगराध्यक्ष सौ .नंदाताई विजयराव बावणे मॅडम हजर होत्या तसेच तहसीलदार डॉ.विनोद डोणगावकर साहेब व संवर्ग विकास अधिकारी श्री. विजय पेंदान साहेब उपस्थित होते तसेच आपल्या दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम बल्की तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नाहेदा डॉ. अहिरकर नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीक्षा ताकसांडे डॉ.शुभम चौधरी तसेच आरोग्य विभागातील सर्व आरोग्य कर्मचारी हजर होते.
जिवती येथील उद्घाटन ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी नगरपंचायत जिवती चे उपाध्यक्ष डॉ.अंकुश गोतावळे साहेब तसेच संवर्ग विकास अधिकारी डॉ.भागवत रिजेवाड सर हे सुद्धा उपस्थित होते प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती चे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनकाडे सर तालुका आरोग्य अधिकारी जिवती येथील संपूर्ण स्टाफ तसेच आपला दवाखाना जिवती चे वैद्यकीय वैद्यकीय डॉ.महेश केंद्र उपस्थित होते.#khabarkatta chandrapur
सदर दवाखाना हा दुपारी दोन ते संध्याकाळी आठ या वेळेत असेल यामध्ये श्रमजीवी, कामगार, शेतकरी यांना प्रामुख्याने आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे दवाखाना बाह्य रुग्ण तत्त्वावर असेल यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब दैनंदिन होणारे आजार आदींची नियमित तपासणी करण्यात येणार आहे . कोरपना येथे सदर दवाखाना पोस्ट ऑफिसच्या बाजूला तहसील कार्यालय रोडला असून जिवती येथे तहसील कार्यालयाच्या समोर आहे .याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी कोरपाणा व जिवती डॉ. स्वप्नील टेंभे यांनी केले आहे.#khabarkatta chandrapur

