खबरकट्टा/चंद्रपूर:
यवतमाळ मध्ये एक हत्येचा प्रकार घडलाय.या प्रकाराने पोलीस देखील चक्राहून गेलेत. एका आईसह कुटुंबाला स्वतःच्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय.आईने सुपारी देवून आपल्या मुलाची हत्या केली. पोलीस तपासादरम्यान, धक्कादायक कारण समोर आले आहे. योगेश विजय देशमुख (25 रा. नेरपिंगळी ता. मोर्शी जि. अमरावती) असे मृताचे नाव आहे.#khabarkatta chandrapur
यवतमाळ लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने पोलीस देखील चक्राहून गेलेत. कारण एका आईनेच स्वतःच्या मुलाची सुपारी देऊन त्याला संपवून टाकण्याचा धक्कादाय प्रकार समोर आलेला आहे. पाच लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडून आणली उघडकीस आली असून, याप्रकरणी लोहारा पोलीस सहा जणांना अटक केली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिकची तपासणी केली तेव्हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.#khabarkatta chandrapur
मुलाचा प्रचंड त्रास होता. त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले, असे मृत मुलाच्या आईने पोलिसांना सांगितले. मुलाला त्याच्या गावावरून यवतमाळात पाठविले. तो मामाकडे काही दिवस राहिला. या दरम्यान आई वंदना हिने बहिण उषा चौधरी हिच्या घरी जावून योगेशच्या खुनाचा कट रचला. तसेच पाच लाख रुपयात खुनाची सुपारी देण्याचे ठरले होते. त्यापैकी दोन हजार रुपये ॲडव्हॉन्स देण्यात आले होते. यानंतर विकी भगत आणि राहुल पठाडे या दोन्ही आरोपींनी योगेशला 20 एप्रिल रोजी चौसाळा जंगलात नेत त्याची हत्या केली.#khabarkatta chandrapur
मृताची आई, वडील, चुलत भाऊ आणि अन्य काही कुटुंबांनी आरोपींना मुलाची हत्या करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी • दिली होती. चौसाळा जंगलात नेऊन खून केल्याचा निष्पन्न झालं त्यानंतर पोलिसांनी हत्या प्रकरणात सहा आरोपींना ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणात पोलिसांनी त्याची आई वंदना विजय देशमुख, मावशी उषा मनोहर चौधरी, मावसा मनोहर चौधरी, मावसभाऊ लखन चौधरी तिघे रा. देवीनगर यवतमाळ यांना अटक केली. तर सुपारी घेवून योगेशची हत्या करणारे विक्की भगत व राहुल पठाडे रा. देवीनगर लोहारा यांनाही ताब्यात घेतले आहे.

