बल्लारपूर :- सध्या बल्लारपूर शहराचे तापमान 43 अंशावर गेला आहे. शरीराची लाही लाही होत आहे. उष्ण वारे वाहत आहे. उन्हाची तीव्रता वाढत आहे. ठिकठिकाणी नागरिकाकरीता पाणपोई ची व्यवस्था केली आहे. अगोदर रांजण मधील थंडगार पाणी मिळत होते तर आता आरओ चे थंड पाणी मिळत आहे. पण जनावरे करिता पाण्याची सोय कुठे ही नाही आहे. हा अस्वस्थ करणारा प्रश्न राज युवा ग्रुप गौरक्षण वार्ड बल्लारपूर चे अध्यक्ष तथा भाजपा चे शहर सचिव नीरज झाडे ला पडले. गौरक्षण वार्ड परिसरात मुक्या जनावरांना पाण्याची व्यवस्था करण्याची संकल्पना त्यांनी आपल्या मित्र मंडळीकडे मांडली. होकार मिळताच त्यांनी पाणपोई सुरू केले.#khabarkatta chandrapur
गौरक्षण वार्ड येथे भाजपा शहर सचिव यांनी पुढाकार घेऊन मुक्या जनावरांना साठी पाणपोई सुरू केली आहे. त्यांच्या साठी पन्नास लिटर ची टाकी दिवसातून दोन वेळा भरून ठेवली जात आहे. या शुभ कामाकरीता त्याचे मित्र राहुल फासलवार, रविंद्र कामपेल्ली, बानेश बोंडकी, बाळु खोब्रागडे, रजय शर्मा, राहुल तोगलवार, अजय पानम सह आदी सहयोग करीत आहे. तसेच नीरज झाडे यांनी नागरिकांना आवाहन केले की मुक्या जनावरांकरीता प्रत्येकानी आपल्या घरा समोर व रोड वर पाणी ची व्यवस्था करावी.#khabarkatta chandrapur

