खबरकट्टा/चंद्रपूर:
गडचिरोली : विद्यार्थ्यांना नीतिमूल्याचे धडे देणाऱ्या एका शिक्षकाने भिंतीला छिद्र पाडून कपडे बदलणाऱ्या महिलांचे चित्रीकरण केल्याचा संतापजनक प्रकार देसाईगंज येथे सोमवारी उघडकीस आला. एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद होताच पोलिसांनी शिक्षकाला बेड्या ठोकल्या.
पोलिसांच्या माहितीनुसार, नंदकिशोर भाऊराव धोटे ( वय 45 रा. कुरखेडा, ह.मु. देसाईगंज) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. तो कुरखेडा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. देसाईगंज येथे स्वत:च्या घरी त्याची पत्नी शिवणकाम करते. त्यामुळे पत्नीकडे महिलांची रेलचेल असते. कपडे बदलण्यासाठी छोटी खोली तयार केलेली आहे.#khabarkatta chandrapur
या खोलीच्या भिंतीला छिद्र पाडून नंदकिशोर धोटे हा मोबाइलद्वारे महिलांचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण करत असे. यासंदर्भात पीडित महिलेला कुणकुण लागताच तिने देसाईगंज ठाणे गाठून फिर्याद दिली.#khabarkatta chandrapur

