दुचाकी चोरी करणाऱ्या बंटी -बबलीला अटक...#Bunty-Bubli, who stole two-wheelers, was arrested - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



दुचाकी चोरी करणाऱ्या बंटी -बबलीला अटक...#Bunty-Bubli, who stole two-wheelers, was arrested

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी शहरातील ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. शुभम शेरकुले यांनी सकाळ च्या सुमारास आपली एम. एच 33- 5557 दुचाकी वाहन रुग्णालयातील आवारात ठेवून रुग्णालयात ओपीडी करिता गेले.#khabarkatta chandrapur

काही वेळानी आरोपी सुषमा /पिंकी विशाल चाचेरकर वय 35 रा. भवानी वार्ड ब्रम्हपुरी व सादम कादेर हलदार वय 31 रा. सिकंदरपुर ता- मंदिरबाजार जिल्हा- उत्तर 24 पं. बंगाल सध्या वास्तव्य भवानी वार्ड ब्रम्हपुरी हे सुमारे 9.30वाजता आपल्या दुचाकी एम. एच. 34 ए. एन- 5889 वाहनाने ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे आले. आपली दुचाकी ठेऊन डॉक्टर शुभम शेरकुले यांची दुचाकी घेऊन पसार झाले. व आपली दुचाकी गाडी दुसऱ्या व्यक्ती ला पाठवुन दुचाकी गाडी पसार केली.#khabarkatta chandrapur

रुग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाले तर दुचाकी गाडी चोरी झाल्याचे दिसून आले. यांची माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला देण्यात आले. लगेच ब्रम्हपुरी पोलीसांनी सी. सी. टिव्ही फुटेज तपासणी करून दुचाकी चोरी करणारे ब्रम्हपुरी तालुक्यात प्रसिद्ध असलेले बंटी-बबली आढळून आले. लगेच भवानी वार्ड ब्रम्हपुरी येथे जाऊन दोन्ही आरोपी ना अटक करण्यात आली. सदर तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मिंलीद शिंदे व पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे याच्या मार्गदर्शना खाली पो. ह तेजराम जंनबधु , योगेश शिवनकर,विजय मैद, मुकेश गजभे, संदेश देवगडे यांनी केले.#khabarkatta chandrapur


Pages