खबरकट्टा/चंद्रपूर:
चिमूर तालुक्यातील नेरी जवळील पांढरवाणी येथील वैभव दशरथ वाघमारे वय -30 वर्ष हे 8 दीवसाअगोदर गावाकडे रजेवर जम्मु - काश्मीर येथुन आले होते .#khabarkatta chandrapur
पोलीस वीभागाच्या माहीती नुसार 15 मे च्या सकाळला ते झोपेतुन उठले तेव्हा उलट्या करू लागले .त्याना नींबु पाणी देण्यात आले पण उलट्या काही बंद झाल्या नाही .त्याना पुढील उपचारासाठी चिमूर येथे दवाखाण्यात नेण्यात आले . उपचार चालु असतानी त्याना ह्रदयवीकाराचा तीव्र झटका आला आणी त्यांचा म्रुत्यु झाला.ते 10 वर्षापासुन जम्मु - काश्मीर मधील पुलवामा येथे सी.आर.पी.एफ .मध्ये नौकरीला होते .अचानक त्यांचा मुत्यू झाल्याने नेरी परीसरात दुखःवटा नीर्माण झाला .त्यांच्या मागे त्यांची पत्नी व परीवार आहे .#khabarkatta chandrapur

