खबरकट्टा/चंद्रपूर:
राज्य सरकारच्या वेबसाईटवर महिला व मुली बेपत्ता होण्याची असलेली आकडेवारी चिंताजनक असल्याची खेद राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकनकर यांनी व्यक्त केली, महिलांच्या तपासासाठी गृह खात्याने स्वतंत्र समिती स्थापन करावी व शोध मोहीम राबवावी आणि दर पंधरा दिवसांनी केलेल्या कारवाई चा अहवाल महिला आयोगाला सादर करावा अश्या सूचना गृह विभागाला केल्या असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकनकर यांनी पत्रपरिषदेत दिली.#khabarkatta chandrapur
महाराष्ट्रात मागील तीन महिन्यांत 16 ते 25 वर्ष वयोगटातील 3 हजार 594 तरुणी बेपत्ता झाल्याची खळबळजनक बाब पुढे आली. नौकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून तरुणींचे लैगिक शोषण केल्या जाते, परराज्यात तसेच देशाबाहेर तरुणीची विक्री करण्यात येते यानुषंगानें गृह विभागाने तपास करावा अशी मागणी रुपाली चाकनकर यांनी गृह विभागाला केली आहे.
राज्य सरकारने राजकारण सोडून या गंभीर विषयाकडे लक्ष घालावे, परंतु तसे होतांना दिसत नसल्याचा आरोप ही त्यांनी केला, ज्या तत्परतेने कार्य व्हायला पाहिजे तशी गती नसल्याचेही त्या बोलल्या.#khabarkatta chandrapur
बेपत्ता तरुणींची जिल्हानिहाय आकडेवारी
अहमदनगर 184, अकोला 41, अमरावती शहर 31, अमरावती ग्रामीण 63, औरंगाबाद शहर 66, औरंगाबाद ग्रामीण 52, बीड 27, भंडार 23, मुंबई शहर 383, बुलढाणा 76, चंद्रपूर 101, धुळे 45, गडचिरोली 13, गोंदिया 46, हिंगोली 14, जळगाव 121, जालना 36, कोल्हापूर 127, लातूर 42, मीरा- भाईंदर 113, नागपूर शहर 108, नागपूर ग्रामीण 169, नांदेड 36, नंदुरबार 37, नाशिक शहर 93, नाशिक ग्रामीण 169, नवी मुंबई 75, उस्मानाबाद 34, पालघर 28, परभणी 27, पिंपरी चिंचवड 143, पुणे शहर 148 आणि पुणे ग्रामीण 156 अशी बेपत्ता तरुणींची संख्या आहे. या सर्व बेपत्ता तरुणी 16 ते 25 वयोगटातील आहेत.#khabarkatta chandrapur

