चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार #santosh-rawat - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार #santosh-rawat

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

मूल येथील काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर आज अज्ञात इसमानी गोळी झाडली. या घटनेत संतोष रावत यांना कोणतीही इजा झाली नसली तरी त्यांच्या हाताला घासून गोळी गेली.
आज सायंकाळच्या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूल शाखेच्या परिसरात ही घटना घडली. गोळीबार करणारा अज्ञात असून तो फरार आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

संतोष रावत यांच्यावर गोळीबार का करण्यात आला? कोणत्या हेतूने करण्यात आला? कोणी केला? की हा गोळीबार कुणी घडवून आणला? या प्रश्नाचे उत्तरे मात्र अनुत्तरीत आहे

मूल शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Pages