बदनामीची धमकी देत विवाहित महिलेचा लैंगिक अत्याचार...#Sexual assault of a married woman under threat of defamation - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



बदनामीची धमकी देत विवाहित महिलेचा लैंगिक अत्याचार...#Sexual assault of a married woman under threat of defamation

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

विवाहित महिलेला बदनामीची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोरपना तालुक्यात घडली आहे. कोरपना तालुक्यातील तेलंगाना सीमेजवळील एका गावातील विवाहित महिलेवर नवऱ्याच्या नाते संबंधातील चुलत मामे भावाकडून तिच्याशी जबरदस्ती करत बदनामीची धमकी देत लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार कोरपना पोलीसात बुधवारी दाखल करण्यात आली आहे.#khabarkatta chandrapur 

पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या घराशेजारी राहणाऱ्या नवऱ्याचा चुलत मामे भाऊ याने पिडीतेला एक महिन्यापासून छेडछाडी करुन तिला तिचे बदनामी ची धमकी देत होता. 20 एप्रिलला पिडीत विवाहित महिला घरात एकटी असताना त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुन्हा दोनदा धमकी देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 10 मे ला हात धरून बकऱ्या चरायला चाल म्हणून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याला कंटाळून पीडित महिलेने पतीसह कोरपना पोलीस स्टेशन गाठून बुधवारी तक्रार दाखल केली.#khabarkatta chandrapur

याप्रकरणी आरोपी शुभम वय 22 वर्ष याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध कलम 376 (2) (एन), 354,417,506 भादवी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.


Pages