खबरकट्टा/चंद्रपूर:
मूल : पंचायत समिती मूलअंतर्गत कांतापेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने पालकांच्या संमतीविनाच विद्यार्थ्यांच्या टीसी एका खासगी शाळेच्या शिक्षकाला दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या शाळेच्या मुख्याध्यापकाने निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले स्वतःच्या मर्जीनेच चिरोली येथील एका शाळेच्या शिक्षकाला दिल्याने संतप्त पालकांनी शनिवारी कांतापेठ येथील शाळेत गोंधळ घातला. मुख्य म्हणजे, शुक्रवारी बुध्द पोर्णिमेची सार्वजनिक सुट्टी असताना त्यांनी शनिवार, 6 मे ही तारीख टाकून या टी. सी. दिल्याने या प्रकारात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. त्यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.#khabarkatta chandrapur
शहरासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय मिळावी म्हणून शासनाने खिरापती घेऊन गाव तेथे शाळा मंजूर केल्या. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाणवा दिसत असून पुरेशा विद्यार्थ्यां अभावी वर्गतुकडी बंद पडत असून शिक्षकांवर त्याचा विपरित परिणाम पडत आहे. त्यामुळे पुरेशी विद्यार्थीसंख्या जुळविण्यासाठी शाळाच नव्हे तर कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी शोधमोहीम राबवावी लागत आहे. नोकरी वाचविण्यासाठी शिक्षकांनाही आर्थिक भार सोसावा लागत असून तहान, भूक आणि वातावरण विसरून शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी पायपीट करावी लागत आहे. त्यातूनच कांतापेठ येथे सदरचा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.#khabarkatta chandrapur
कांतापेठलगतच्या चिरोलीयेथील अनुदानित शाळेत विद्यार्थाची आहे. संख्या कमी असल्याने पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी चढाओढ सुरू आहे. आपल्याला पाचवीचे विद्यार्थी मिळावे, यासाठी प्रत्येक शिक्षक जिल्हा परिषद शाळेत संपर्क साधत असून, जिल्हापरिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांना आर्थिक प्रलोभने दाखविली जात आहे. असाच आर्थिक लाभ मिळविण्याकरिता कांतापेठ येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कुमरे यांनी शाळेचा निकाल लागण्यापूर्वीच सुट्टीचे एक दिवस आधीच सर्व विद्यार्थाच्या शाळा सोडल्याचे दाखले चिरोलीच्या शाळेत परस्पर दिले आहे.#khabarkatta chandrapur

