खबरकट्टा/चंद्रपूर:
चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथील युवतीला परिसरातील नाग मंदिर जवळ काही युवकांनी मारहाण करीत तीचा विनयभंग केल्याची घटना काल मंगळवार ९ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर युवतीला जबर मानसीक धक्का बसला आहे. घटनेतील आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र अद्याप ठोस अशी कारवाई झाली नसल्याने पिडीत युवती दहशतीत जगत असल्याने टोकाची भुमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी कुटूंबीयांना भिती सतावत आहे.#khabarkatta chandrapur
इंदिरानगरातील नाग मंदिर जवळ पिडीत युवतीच्या मामासोबत परिसरातील काही व्यक्तींचे भांडण सुरु होते. याच वेळी पिडीत युवतीने भांडण करणार्या युवकांना हटकले असता आरोपींनी युवतीला अश्लील शिविगाळ करीत मारहाण करीत तीचा विनयभंग केला. आरोपीच्या दहशतीने युवतीला मानसीक धक्का बसला आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसात पिडीत युवतीच्या तक्रारीवरुन भादंवि कलम 354 अ, 294, 506, 427, 34 अन्वये आकाश वर्हाडे, विजय वर्हाडे रा. नागमंदिर, इंदिरानगर, चंद्रपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे अवैध व्यवसायात लिप्त असल्याने पिडीत युवतीला मानसीक धक्का बसला असून आरोपीच्या दहशतीत जगत आहे. असा आरोप पिडीतेच्या कुटूंबीयांनी केला आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी पिडीत परिवार तसेच आप्तांनी केली आहे.#khabar katta chandrapur

