खबरकट्टा/चंद्रपूर:
शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील पोलीस उपायुक्त व उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या 119 पोलीस अधिकाऱ्यांच्या स्थनातरणाचे आदेश निर्गमित केले असुन तसे आदेश गृहविभगाच्या वतीने राज्याचे अवर सचिव स्वप्निल बोरसे ह्यांनी 22 मे 2023 रोजी निर्गमित केले आहे.#khabarkatta chandrapur
ह्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेले धडाकेबाज उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक ह्यांचे गडाचांदुर उपविभागातुन जळगाव शहर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून स्थानांतरण करण्यात आले आहे. राजुरा येथिल उपविभागीय पोलिस अधिकारी राजा पवार ह्यांना नागपुर ग्रामीणच्या उमरेड उपविभागात उपविभागीय अधिकारी म्हणून स्थानांतरित करण्यात आले असुन ब्रम्हपुरीचे मिलिंद शिंदे ह्यांची ठाणे ग्रामीण च्या शहापूर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.#khabarkatta chandrapur
सुशील नायक ह्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत ह्यांचेवार झालेल्या गोळीबाराचे प्रकरण सोडविले असुन, अत्यंत किचकट ठरत असलेल्या ह्या प्रकरणाला राजकीय रंग असल्याचे बोलल्या जात आहे. ह्या प्रकरणात राजकीय तसेच सामान्य जनतेकडून असलेल्या दबावामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी ह्यांनी सदर घटनेच्या तपासाची सुत्रे नायक ह्यांना दिली होती. त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध व जलद तपास करून दोन आरोपींना गजाआड केले. त्यांच्या ह्या यशाची बातमी कळताच जिल्ह्यात आनंद व्यक्त होत असल्याने त्यांच्या बदलीची बातमी कळल्याने सर्वसामान्य जनतेला धक्का बसला आहे.

