खबरकट्टा/चंद्रपूर:
चिमूर तालुक्यातील मासाळ - खडसंगी जी.प.क्षेत्रातील काग्रेंस कार्यकर्ता मेळावा 21 मे रोजी पार पडला .या कार्यकर्ता मेळाव्याला हजारो कार्यकर्त्याची उपस्थीती होती
या काग्रेंस कार्यकर्ता मेळाव्याला अध्यक्ष म्हणुन गडचीरोली वीधानसभा क्षेत्राचे माजी आमदार नामदेवराव उसेंडी ,उद़्घाटक म्हणुन काग्रेंसचे महाराष्ट्र प्रदेश सचीव पंकज गुड्डेवार , काग्रेंसचे युवा नेते दीवाकरभाउ नीकुरे , पंचायत समीती नागभीडचे माजी सभापती प्रफुल खापर्डे ,माजी जी.प.सदस्य गजानन बुटके ,गौतम पाटील ,बबन कुबडे , सोनू कटारे , बंडू मेश्राम , भगवान गुरले, तेजराम झाडे , चंद्रकला मारबते , सुरेखा शेंबेकर , उमेश हींगे , पीजदुरकर सर , उपस्थीत होते .
या कार्यकर्ता मेळाव्याचे संचालन सुधीर पोहनकर सर यांनी केले . तर प्रास्तावीक गजाननजी बुटके यांनी केले . या खडसंगी येथे काग्रेंस कार्यकर्ता मेळाव्याला संबोधीत करतानी काग्रेंसचे युवा नेते दीवाकरजी नीकुरे यांनी म्हटले की , चिमूर वीधानसभा क्षेत्र काग्रेंसचाच बालेकील्ला होता .पण काही चुकीमुळे दोन पंचवार्षीक वीधानसभा नीवडणुकीत पराभव पत्कारावा लागत आहे . देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे . जर आपल्याला चिमूर वीधानसभा क्षेत्रात पंजाला फुलवायच असेल तर आपण कार्यकर्त्यानी कोणतीही गटबाजी न करता एकजुटीने काम करावे लागेल . या चिमुर वीधानसभा क्षेत्रात सध्या नेत्रुत्व बदलाचे वारे वाहत आहेत . चिमूर वीधानसभा क्षेत्रात काम करणारा आमदार पाहीजे की ठेकेदार. हे आता ठरवीण्याची वेळ आली आहे . वरोरा - चिमूर या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सुध्दा त्यांनी ठणकावुन सांगीतले .असे प्रतीपादन कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी केले .#khabarkatta chandrapur
तसेच माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांनी सुध्दा कार्यकर्ता मेळाव्याला संबोधीत करतानी म्हटले की , देशामध्ये राजेशाहीची सरकार आहे . मोठ्याप्रमाणात महागाई वाढली आहे .पेट्रोल , डीझेलचे भाव गगनाला पोहचले आहे . राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रेचा प्रभाव कर्नाटक वीधानसभा नीवडणुकीवर पडला . व तीथे काग्रेंसनी बहुमतानी सत्ता काबीज केली . ये तो झाकी हैं 2024 अभी बाकी हैं. असे प्रतीपादन त्यांनी केली . गजानन बुटके माजी जी.प.सदस्य यांनी खडसंगी - मासळ जी.परीषद नीवडणुक लढण्याचे संकेत दीले . या काग्रेंस कार्यकर्ता मेळाव्याला हजारोच्या संख्येत महीला कार्यकर्ता व पुरूष उपस्थीत होते .#khabarkatta chandrapur
माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतीथीनीमीत्त दोन मीनीट मौन पाडण्यात आले . या कार्यकर्ता मेळाव्याचे आभार प्रदर्शन उमेश हींगे यांनी केले .#khabarkatta chandrapur
