गैर व्यवहार प्रकरणी पाटबंधारे विभाग चंद्रपूर कार्यकारी अभियंता श्यामसुंदर काळे फौजदारी गुन्हा दाखल करूण निलंबनाची कारवाई करा : राजेश वा. बेले - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



गैर व्यवहार प्रकरणी पाटबंधारे विभाग चंद्रपूर कार्यकारी अभियंता श्यामसुंदर काळे फौजदारी गुन्हा दाखल करूण निलंबनाची कारवाई करा : राजेश वा. बेले

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी दिनांक 16/ 1/ 20233 रोजी माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री व सुधीरव सुधीरभाऊ मुनगंटीवार जिल्ह्याचेे पालकमंत्री अधीक्षक अभियंता चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ चंद्रपूर यांना दिल्ली होती त्यानुषंगाने अधीक्षक अभियंता पाटील यांनी 17/ 1 /2023 रोजी कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर पी एन वाकुडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली त्या अनुषंगाने वाकुडे यांनी अहवाल थातूरमातूर करणारा दिला.#khabarkatta chandrapur

श्यामसुंदर काळे अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांना अधीक्षक अभियंता पाटील यांनी 15 /2 /2023 रोजी विचारणा केली की आपल्यावरती का कारवाई करण्यात कारवाई का करू नये अशी विचारणा केल्या असल्यास श्याम सुंदर काळे यांनी 20/02/2023 रोजी लेखी त्यांच्या पत्राचे उत्तर दिलेदिल्यानंतर तात्काळ बांधकाम थांबविले आहे.संघटनेस कार्यालय बांधकामास दिलेली परवानगी ही विभागाचे दिनांक 03/10/2022 च्या पत्रान्वये स्थगीत करण्यात आली असुन तेव्हापासून संघटनेने पुढील बांधकाम केलेले नाही.#khabarkatta chandrapur

तसेच संघटनेस कार्यालय बांधकामास दिलेली परवानगी ही विभागाचे दिनांक 01/03/2023चे रद्द करण्यात आली आहे सद्यस्थितीत ती जागा झालेल्या बांधकामासह विभागाच्या ताब्यात असुन संघटनेमार्फत अतिक्रमण केलेले नाही किंवा त्याचा कोणताही अनाधिकृत ताबा नाही. सदरील संघटना कार्यालयाची इमारत ही विभागाचे परिसरातील मोकळ्या जागेत बांधण्यात येत होते, त्यासाठी विभागाचे कोणतेही पक्के बांधकाम तोडण्यात आलेले नव्हते.#khabarkatta chandrapur

सदरील बांधकामाच्या परवानग्या रद्द केल्याने, ती जागा आहे त्या स्थितीत विभागाचे ताव्यात राहणार आहे. सदरील इमारत बांधकाम करण्यासाठी कोणताही शासन निधी खर्च झालेला नाही. वरील सर्व बाबीचा विचार करता सादर करण्यात येते की, संघटना कार्यालय बांधकामास दिलेली परवानगी अनुषंगाने केलेली कार्यवाही ही सदहेतूने करण्यात आलेली होती व त्यामागे कोणताही दुषीत हेतूने किंवा अन्य उद्देशाने करण्यात आलेली नव्हती तसेच यात माझा स्वतःचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नव्हता.

झालेल्या कार्यवाहीमुळे शासनाचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही इमारतीचे पायव्यापर्यंतचे झालेले बांधकाम काढून टाकण्यासंबंधी काही आदेश झाल्यास किंवा दुरुस्ती संबंधी आदेश झाल्यास मी स्वतः चे खर्चाचे से काढून देण्यास तयार आहे.

या उपर माझ्याकडून उदघाटन फलकाचे अनावरण इत्यादी चुका झाल्या असल्यास त्याबाबत क्षमा करण्यात यावी व या तक्रारीतील आरोपातून मुक्तता करण्यात यावी, व माझेवर कोणतीही प्रशासकीय कार्यवाही करण्यात येऊ नये ही विनंती.

दिनांक 03/02/2023 ला सादर केलेले स्पष्टीकरण. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी दिनांक 22/ 5/ 2023 रोजी मुख्यमंत्रीएकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रपूर जिल्हा पालकमध्ये सुधीर भाऊऊ मुनगंटीवार साहेब अप्पर सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना तक्रार केली

चंद्रपुर पाटबंधारे विभाग, चंद्रपुर या कार्यालयाच्या परिसरातील इमारतीला तोडुन अनाधिकृत बांधकाम करण्याकरीता देण्यात आलेल्या पस्पर मंजुरी देणा-या श्यामसुंदर काळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, चंद्रपुर यांनी शासकीय पदाचा गैरवापर करुन बांधकामाकरीता अभियंता दिनानिमीत्य चंद्रपुर- गडचिरोली ईरिगेशन कॉन्ट्राक्टर, चंद्रपुर असोसिएशन संघटनेच्या कार्यालय ईमारतीचे भूमीपुजन दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात आले. या कार्यालयातील ईमारत बेकायदेशिर तोडुन या संघटनेने शासकीय कार्यालयाच्या जमिनीवर अनाधिकृत कब्जा करून बांधकामाला सुरुवात केली. या संघटनेशी मिलीभगत करून श्यामसुंदर काळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, चंद्रपुर यांनी आपल्या पदाचा दुरउपयोग सहमताने शासकीय जमिनीवरती कब्जा करण्यात आला.

श्यामसुंदर काळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, चंद्रपुर यांनी शासकीय पदाचा गैरवापर केल्यामुळे यांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करुन निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी व श्यामसुंदर काळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, चंद्रपुर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या मुलाला अधिक्षक अभियंता, चंद्रपुर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपुर यांच्या अंतर्गत येणा-या कार्यालया मार्फत स्वतःच्या सख्ख्या मुलाला तेथील कॉन्ट्रक्ट देण्यात आला आहे. अशा प्रकारच्या गैरव्यवहार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

चंद्रपुर कार्यालयाची ईमारत तोडुन अनाधिकृत कब्जा करणा-या चंद्रपुर-गडचिरोली ईरिगेशन कॉन्ट्रक्टर, चंद्रपुर असोसिएशन चंद्रपुर या संघटनेच्या पदाधिकारी व सभासद यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून संपूर्ण संघटनेतील कॉन्ट्रक्टरची परवानगी रद्द करुन काळया यादीत टाकण्यात यावे.

Pages