मर्डर ब्रेकींग: अपंग आईमुळे चिडचिड, तणाव; मुलाने घाव घालून केले मातेला ठार...#Irritated, stressed by disabled mother; The son killed the mother by wounding him - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मर्डर ब्रेकींग: अपंग आईमुळे चिडचिड, तणाव; मुलाने घाव घालून केले मातेला ठार...#Irritated, stressed by disabled mother; The son killed the mother by wounding him

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

वर्धा : गाढ झोपेत असलेल्या आईस लाकडी दांड्याने सतत प्रहार करीत खून केल्याची घटना सोमवारी उजेडात आली. आर्वी तालुक्यातील मातोडा या गावातील घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. हेमराज महादेव तुमसरे असे आरोपी मुलाचे नाव आहे.त्याची आई कौशल्याबाई महादेव तुमसरे वय 82 या दोन्ही पायाने अपंग असून जमिनीवर घासत चालायच्या. आरोपी त्यामुळे चिडचिड करायचा.त्याची पत्नी व मुलगी हे घटनेच्या रात्री काकाकडे झोपण्यास गेल्या.#khabarkatta chandrapur


विद्युत पुरवठा खंडित झाल्याने प्रणिता तुमसरे यांना जाग आली. तेव्हा त्या घराबाहेर पडल्यावर त्यांना सासुस दांडक्याने नवरा मारहाण करीत असल्याचे दिसून आले. तिने ही घटना जाऊ मीराबाई यांना सांगितली.त्यांनी जावून पाहताच कौशल्याबाई मृत झाल्याचे दिसून आले.याची तक्रार पत्नी प्रणिता यांनी आर्वी पोलीसांकडे केली.आरोपी मुलगा हेमराज यास सायंकाळी अटक करण्यात आली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.#khabarkatta chandrapur

Pages